37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता जिल्हा पुरवठा विभागातील महसुल सहायकासह महिला सेवकास 30 हजारांची लाच घेताना पकडले

जिल्हा पुरवठा विभागातील महसुल सहायकासह महिला सेवकास 30 हजारांची लाच घेताना पकडले

0
76

blank

हिंगोली-वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराला परवाना देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा पुरवठा विभागातील महसुल सहाय्यक व महिला सेविकेस शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. महसुल सहाय्यक शंभुनाथ दुभळकर व सेविका जमुनाबाई इसाये अशी त्यांची नावे असल्याचे सुत्रांनी सांगितले.

या संदर्भात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदारावर काही दिवसांपुर्वीच निलंबनाची कारवाई झाली होती. सदर दुकानाचा परवाना निलंबीत झाला होता. त्यानंतर पुन्हा परवाना देण्यासाठी दुकानदाराकडे तीस हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर संबंधित दुकानदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यावरून लाचलुचपत विभागाचे उपाधिक्षक निलेश सुरडकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक महमद युनूस, जमादार विजयकुमार उपरे, तान्हाजी मुंडे, रुद्रा कबाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, अवी किर्तनकार, विजय शुक्ला, राजाराम फुफाटे, हिंमतराव सरनाईक, योगिता अवचार, यांच्या पथकाने आज दुपारी जिल्हा पुरवठा विभागात सापळा रचला होता. ठरल्या प्रमाणे संबंधित दुकानदाराकडून सेविका इयासे यांनी दुभळकर यांच्या सांगण्यावरून सदर रक्कम घेतली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.

blank