
मुंबई/गोंदिया,दि.6- सध्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागासाठीच्या निवडणुक प्रक्रियेला राज्य निवडणुक आयोगाने आज स्थगिती दिली आहे.
राज्य सरकारने नुकताच ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 27 टक्के आरक्षण देण्यासाठी एक अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाच्या आधारे राज्य निवडणुक आयोगाने सध्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये ओबीसींसाठी 27 टक्के जागा आरक्षित ठेवल्या होता. असे असले तरी आज सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या एका याचिकेनुसार आज ओबीसी आरक्षणाला स्थिगिती दिली आहे. परिणामी, राज्यात नियोजित निवडणुक प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. यानुसार ओबीसीसाठी आरक्षित जागा वगळता इतर जागांसाठी मात्र निवडणुका ठरल्या प्रमाणे होणार आहेत.




