38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या समाज जोडो अभियानातर्गत रथयात्रेस सुरुवात

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या समाज जोडो अभियानातर्गत रथयात्रेस सुरुवात

0
83

blank

पुणे – महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने समाज जोडो अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार्या रथयात्रेस बुधवारला(दि.८)संत संताजी महाराज जयंती पासून संताजी महाराज जन्मस्थान चाकण येथून सुरूवात करण्यात आली. रथयात्रा प्रारंभ कार्यक्रमास प्रदेश अध्यक्ष खा.रामदासजी तडस, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, महासचिव डॉ. भूषण कर्डिले, युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष आ.संदिप क्षिरसागर, सेवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सुभाष पन्हाळे, अध्यक्ष सुदूंबरे संस्था शिवदास उबाळे, ठाणे विभाग अध्यक्ष सुनिल चौधरी, युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, गोपाळशेट जगनाडे चाकण, विजयकुमार शिंदे कार्याध्यक्ष पुणे विभाग यांची प्रमुख उपस्थिती होती.
रथयात्रेत संताजी महाराज पुतळा, पूजा पादुका, हस्तलिखीत गाथा दर्शन साठी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ८ डिसेंबर २०२१ ते १४ जानेवारी २०२२याकळात जाणाऱ्या या पालखी सोहळ्यात तेलीसमाज व ओबीसी समाज बंधू-भगिनींनी रथयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सदर रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सोबत जोडलेल्या दैनंदिन तक्त्यानुसार सर्व तेली समाज बंधू-भगिनींना, प्रस्थापित समाज मंडळे व समाजेतर बांधवांनांही श्री संत संताजी महाराजांचे चरित्र महती संपूर्ण महाराष्ट्राला कळावी व समाज संघटीत होवून समाजाची विकास होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे खा. रामदास तडस यांनी आवाहन केले तर कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने नुकतेच सुरु केलेल्या तेली समाजाचे ॲप द्वारे समाजाची महाराष्ट्रभर जनगणना व्हावी व समाजाचा डाटा गोळा करणे गरजेचे आहे असे मत मांडले तर महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांनी ओबीसींवर सतत होत असलेल्या अन्यायाबाबत वेगवेगळ्या मार्गाने वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करावे लागेल त्याकरिता ओबीसीत तेली समाज नेतृत्व करेल असे स्पष्ट केले.
महाराष्ट्र दिनांक ८ डिसेंबर ते १४ जानेवारी २०२२ या साधारणतः ३७ ते “  अशोक काका व्यवहारे ,महासचिव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार,युवाध्यक्ष संदिपभैय्या क्षीरसागर,सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाळे,उपाध्यक्ष  बापू विभुते, ठाणे विभाग अध्यक्ष व समन्वयक सुनील चौधरी तसेच युवा आघाडीचे महासचिव नरेंद्र भाऊ चौधरी यांचेसह विविध विभागातील महाराष्ट्र प्रांतिक महासभेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की, आपापसातील सर्व जाती,पोटजाती व संघटना मतभेद विसरून आपले दैवत संत  संताजी जगनाडे महाराज यांचे पालखीचे जोरदार स्वागत करावे व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
उदघाटन कार्यक्रम यशस्वी सदुंबरे संस्थान सचिव अॅड राजेश येवले होण्यासाठी अविनाश कहाणे अध्यक्ष उत्तर पुणे, अनिल राऊत अध्यक्ष पिंपरी चिंचवड, संतोष माकुडे अध्यक्ष पुणे महानगर, अविनाश कहाणे, अध्यक्ष, संजय फल्ले, सचिव उत्तर पुणे जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व *तिळवण तेली समाज चाकण व संत संताजी महाराज संस्था सुदूंबरे यांनी प्रयत्न केले.

blank