31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ वाशीम जिल्हा पोलिस दलात ‘दृष्टी’ कार्यान्वितगुन्हेगारीला बसणार आळा

वाशीम जिल्हा पोलिस दलात ‘दृष्टी’ कार्यान्वितगुन्हेगारीला बसणार आळा

0
22

वाशीम-जिल्ह्यात मालमत्तेसंबधीच्या गुन्ह्यावर प्रतिबंध करणे, महिला छेडखानीच्या घटनांना आळा घालणे, लोकांमध्ये पोलिसांप्रती विश्‍वास निर्माण करणे आदी उद्देश समोर ठेवून जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून शहरात विविध ठिकाणी ‘क्यू आर कोड’ व ‘जीपीएस’ समावेशित दृष्टी ग्रस्त प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
यासंदर्भात महिती देतांना जिपोअ बच्चन सिंह यांनी सांगितले की, यापूर्वी जिल्ह्यातील 13 पोलिस स्टेशन अंतर्गत 440 ‘क्यू आर कोड’ कार्यान्वित करण्यात आले. परिणामकारक गस्त व जनतेला पोलिसांचे अस्तित्व दिसावे, यासाठी ‘क्यू आर कोड’ ची संख्या 3700 वर पोहोचविण्यात आली आहे. याशिवाय सकाळी 5 ते 7, सायंकाळी 5.30 ते 9.30 या वेळेत पायी पेट्रोलिंग, रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रग्रस्त, सकाळी 8 ते रात्री 8 व रात्री 8 ते पुन्हा सकाळी 8 या वेळेत बीट मार्शल पेट्रोलिंग केली जात आहे. निर्भया पथक, वाहतूक शाखेकडून पेट्रोलिंग दरम्यान ‘क्यू आर कोड’ मोबाईलद्वारे स्कॅन केले जाते या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती बच्चन सिंह यांनी दिली.
जिल्ह्यातील 91 अधिकारी आणि 904 पोलिस अंमलबदारानी ई पोलिस अ‍ॅप आपआपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घेतले आहे. आतापर्यंत 3962 महत्वपूर्ण संवेदनशील ठिकाणापैकी मंदिर परिसरात 1125, मशिदी 170, पुतळे 920, शाळा व कॉलेज 225, बँका व वित्तीय आस्थापना 160, एटीएम 25, ज्वेलर्स 225, शासकीय कार्यालये 115, मुख्य बाजारपेठ 25 ठिकाणी ‘क्यू आर कोड’ लावण्यात आले आहे. पोलिस वाहनांचे आधुनिकीकरण करुन पूर्वी 14 वाहनांना असलेली जीपीएस यंत्रणा वाढवून ती 77 वाहनंना करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस वाहनांचे सतत लोकेशन मिळत असल्याचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सांगितले.