37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता पत्नीच्या खून प्रकरणात पतीची निर्दोष मुक्तता

पत्नीच्या खून प्रकरणात पतीची निर्दोष मुक्तता

0
157

blank

गोंदिया, ता. ११ ः पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी पतीची जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
कुडवा गोंदिया सुमन मनोज सावणकर यांचा ५ मार्च २०२० रोजी खून करण्यात आला होता. त्यांच्या शरीरावर २० जखमा होत्या. तसेच गळा आवळला होता. दरम्यान, या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपी पती मनोज सावणकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. न्यायालयात खटला चालला. ३० नोव्हेंबर रोजी न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या बाजू एेकून घेत आरोपी मनोज सावणकर यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकारतर्फे महेश चांदवानी, तर बचाव पक्षातर्फे मोबीन शेख यांनी काम पाहिले.

blank