
उत्कृष्ट चित्रकार,पर्सनल डेव्हलपमेंट कोच, पटकथालेखक, समाजकार्यात अग्रेसर,महापुरुषांच्या विचाराने प्रेरीत होऊन जनसामान्य माणसापंर्यत बुध्द-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे बिजारोपन करणारा हा युवक खरोखरच अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा धनी आहे.एक दोन आठवडयाआधी माझा विद्यार्थी असलेल्या राऊत सरांनी त्यांच्याशी भेट घडवून आणली. बऱ्याच विषयावर चर्चा झाली. संथागार परिवाराशी जुळलेला असल्याचे कळल्यावर खुप आनंद झाला. गोंदिया येथील मूळचे रहिवासी असलेले एस.एन.संकल्प उत्कृष्ट चित्रकार, पर्सनल डेव्हलपमेंट ट्रेनर, पटकथा लेखक तसेच युट्युबर म्हणून कार्य करत आहेत. सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट, मुंबई येथून चित्रकलेतून पदवीचे शिक्षण (२००५-२००९) घेत मैत्रेय ग्लोबल आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून मागील बारा वर्षापासून ज्यांना चित्रकलेची आवड आहे अशा विद्यार्थ्यांना, तसेच चित्रकलेत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या अकॅडमीच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. तसेच कॅम्पुटर ग्राफिक्स मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करत नोकरी न करता त्यांनी स्वत ची एक डिझाईन फर्म चालू केली इन्फिनिटी डिझाईन सोल्युशन हे फर्म प्रिंट, वेब आणि मल्टिमिडीया आदी क्षेत्रात सेवा प्रदान करते. त्यांनी चित्रपट लिखानासाठी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण ( एम.ए) इंग्रजी साहित्यात केले आहे.
संकल्पची आई सुधाताई एन. खोब्रागडे या जिल्हापरिषद शिक्षिका होत्या व नंतर केंद्रप्रमुख पदावर कार्यरत राहून २०१२ साली सेवानिवृत्त झाल्या.पुढच्या दोन वर्षांतच त्या अल्पशा आजाराने दगावल्या. मरणोपरांत अंतिम इच्छेनुसार दान पारमितेचे महत्व जाणत त्यांचे “देहदान” नागपूर मेडीकल कालेज ला ,(२०१४) करण्यात आले होते.
संकल्पचे वडील नयनकुमार खोब्रागडे हे बौद्धमहासभेचे कार्यकर्ते आहेत व त्यांनीसुद्धा अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.एस. एन. संकल्प यांनी व्यावसायिक उपक्रमाव्यतिरिक्त 2008 मध्ये CERI इंडिया द्वारा आयोजित भारतातील निवडणूक सुधारणा, NASCO इंडिया द्वारा आयोजित शिकलसेल जागरूकता कार्यक्रम, युवा जागृतीचा कार्यक्रमाबरोबर महाराष्ट्रातील अनेक खेडेगावात इतर शैक्षणिक कार्यक्रम राबवित ते अनेक धम्म कार्यात सक्रिय आहेत.संकल्प यांना युवावर्गाची एक देशपातळीवरील फडी निर्माण करुन भावी पीढ्यांसाठी अनेक सामाजिक / धार्मिक व आर्थिक उपक्रम राबविण्याचा हा त्यांचा माणस आहे. लवकरच बुध्द, फुले, शाहू,आंबेडकर चळवळ प्रणित चित्रपटांची निर्मिती करुन त्यात बहुजन कलावंतासाठी करिअर च्या संधी विदर्भाच्या धर्तीवरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
──────⊱◈◈◈⊰─────
संकलन व लेखन
✍️प्रा.विनोदकुमार माने
‘विसू’ निवास, आझाद वार्ड
बौध्दनगर मरारटोली, गोंदिया
भ्रमनध्वनी 9404841997





