
अमरावती- गेल्या तीन दशकांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संरक्षण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणार्या किशोर रिठे यांना महाराष्ट्राची गिरिशिखरे हा पुरस्कार घोषित झाला आहे. मुंबईच्या पीपल्स आर्टस सेंटर द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २६ डिसेंबर २0२१ रोजी मुंबईत रंगशारदा नाट्यमंदिरात होणार्या एका भव्य दिव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत केल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस १ मे २0२0 रोजी ६0 वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सवी वषार्चा सोहळा १ मे २0२0 रोजी नियोजित होता. परंतु कोव्हीड प्रादुभार्वामुळे व शासनाच्या निबंर्धा मुळे हा सोहळा आता २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावणार्या ५0 व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये शरद पवार (राजकारण), डॉ.जयंत नारळीकर (विज्ञान), कु.उषा मंगेशकर (पार्श्व गायिका), सुरेश वाडकर (पार्श्व गायक), डॉ. भालचंद्र नेमाडे (साहित्य), सुनील गावस्कर (क्रिकेट), डॉ. मीरा बोरवणकर (नोकरशाही), श्री.राजीव खांडेकर (इलेक्ट्रॉनिक मध्यम), सौ.तेजस्विनी सावंत (क्रीडा), डॉ. उदय माहोरकर (वैद्यकीय सेवा),अमोल पालेकर (अभिनेता), श्रीमती रोहिणी हट्टंगडी (अभिनेत्री), श्री.भीमराव पांचाळे (मराठी गझल गायक), डॉ.विश्वनाथ कराड (शैषणिक). डॉ.जब्बार पटेल (नाटक व चित्रपट), अशोक पत्की (संगीत दिग्दर्शक), कुमार केतकर (पत्रकार), डॉ.दीपक शिकारपूर (माहिती तंत्रज्ञान), सिंधुताई सपकाळ (समाजकार्य), अनंत कुलकर्णी (अभियंता), हनमंतराव गायकवाड (आतिथ्य क्षेत्र), उमेश झिरपे (पर्वतारोहण), प्रवीण ठिपसे (बुद्धीबळ), विश्वासराव मांडलिक (योग गुरु), दिनकरराव पाटील (अन्न प्रक्रिया), आदिंचा समावेश आहे.





