31.4 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home क्रीडा जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते प्रशिक्षणार्थींना ट्रॅक सुटचे वितरण व क्रीडा संकुलाची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते प्रशिक्षणार्थींना ट्रॅक सुटचे वितरण व क्रीडा संकुलाची पाहणी

0
30

blank

गोंदिया,दि.21 : क्रीडा मंत्रालय केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया
खेलो’ योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्याला ॲथलेटिक्स या खेळाचे सेंटर
प्राप्त झाले असून जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे हस्ते
प्रशिक्षणार्थींना ट्रॅक सुटचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन
अधिकारी कावेरी नाखले व जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड
प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना
2024 च्या उन्हाळी ऑलिम्पिकचे उद्दिष्ट्ये लक्षात घेऊन व नियुक्त करण्यात
आलेले क्रीडा मार्गदर्शक हेमराज बहेकार व जागृत सेलोकर यांच्या
मार्गदर्शनात सराव करुन सदर खेळात अतुलनीय कामगिरी करुन यश संपादन करावे
अशा शुभेच्छा दिल्या.

गोंदिया जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा विकास साध्य करण्याच्या
दृष्टीने जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी जिल्हा क्रीडा संकुलात निर्मीत
क्रीडा सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नाविण्यपूर्ण
योजनेअंतर्गत बास्केटबॉल कोर्ट, लॉनटेनिस कोर्ट व जलतरण तलाव सभोवताल
प्रेक्षक गॅलरी शेड तयार करणे या कामाची तसेच अत्याधुनिक व्यायाम
साहित्याची पाहणी करुन जिल्हा क्रीडा संकुलामध्ये आवश्यकतेनुसार क्रीडा
सुविधा निर्माण केल्या जातील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी
क्रीडा संकुलामध्ये क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा प्रेमी व खेळाडू मोठ्या
संख्येने उपस्थित होते.