बसपाची राज्यपालांना निवेदनातून मागणी
गोंदिया- बहुजन समाज पार्टी गोंदिया जिल्हा यूनिट तर्फे महामहिम राज्यपाल यांच्या नावे जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिलेल्या निवेदनातून, ओबीसी चे राजकीय आरक्षण निश्चित झाल्याशिवाय राज्यात आगामी काळात होणाऱ्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेवू नये असे स्पष्ट निर्देश राज्य सरकार ला देण्याची मागणी निवेदनातून केली.
बसपा ने दिलेल्या निवेदनातून राज्यातील महाविकास आघाडी सरकार वर आरोप केला की, स्वतः ला ओबीसी हितैषी म्हनवून घेणारे राज्य सरकार सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणा सम्बन्धीची बाजू प्रभाविपणे तसेच अभ्यासपूर्णरित्या मांडण्यात सपसेल अपयशी ठरले. त्यांच्या वेळकाढूपणाच्या भूमिकेमुळे त्यांचे खरे चेहरे उघडे पडले.
बसपा ने आपल्या निवेदनातून मागणी केली की, ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व अबाधित राखण्यासाठी ओबीसी आयोगाला पुरेसा निधी वेळेत उपलब्ध करून आतापासुनच ओबीसींचा इम्पेरिकल डाटा वेळेत एकत्रित करण्याचे निर्देश महामहिम राज्यपालानी राज्यातील महाविकास आघाडी सरकार ला द्यावे.
निवेदन सादर करताना प्रामुख्याने गोंदिया जिल्हा बसपा चे प्रभारी विलास राऊत, जिल्हाध्यक्ष दिनेश गेडाम, जिल्हा सचिव अनील मौर्य, बसपा नेते अजय राहुलकर, देवेंद्र वासनिक, अत्तदीप मेश्राम तथा कार्यकर्ते उपस्थित होते.