37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News समता परिषदेच्या रास्ता रोको आंदोलनाने जालना शहर दणाणले…!

समता परिषदेच्या रास्ता रोको आंदोलनाने जालना शहर दणाणले…!

0
37

blank

*”आंदोलकांनी दिल्या नो रिझर्वेशन, नो इलेक्शन” च्या घोषणा*
जालना,दि.23ः- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणूका घेण्यात येऊ नयेत या मागणीसाठी आज अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगनराव भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या आदेशाने व संघटनेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष नवनाथ आबा वाघमारे यांच्या नेतृत्वात जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्का जाम (रास्ता रोको) आंदोलन करण्यात आले. यावेळी असंख्य समता सैनिक रस्त्यावर उतरल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या, त्यामूळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. यावेळी आंदोलकांच्या प्रामुख्याने मागण्या म्हणजे ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे, विना आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेऊ नये,केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला इम्पेरिकल डेटा तात्काळ देउन ओबीसींना न्याय द्यावा. या आंदोलनाला संघटनेचे प्रदेश प्रवक्ते प्रा. संतोष विरकर,जिल्हा उपाध्यक्ष सुंदरराव कुदळे, युवक जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, राजेंद्र राख,शहराध्यक्ष दीपक वैद्य, मोईज अंसारी,गजानन गीते,सुधाकर घेर, राधाकिसन माने, जि. प. सदस्य बबनराव खरात, इंद्रजीत बापू घनवट, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बोरकर, दशरथ तोंडूळे,शिवाजी बापू गाडेकर, तालुकाध्यक्ष बद्रीनाथ गाढवे, ज्ञानेश्वर खरात, रंगनाथ उकंडे, मधुकर झरेकर, सुनील बनकर, गोरख हिरे, प. स. सदस्य सर्जेराव शेवाळे, सरपंच दत्ताभाऊ गाढवे, त्र्यंबकराव हजारे,सरपंच गणेश वाघमारे, भास्करराव वराडे, संतोष जमधडे,राम देवकर, संतोष रासवे, रामप्रसाददादा गाढवे, गणेश पाऊलबुद्धे,दगडु बडदे, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे,पांडुरंग शिंदे, सुभाष गिराम, नितीन इंगळे, एकनाथ राऊत,अनील वाघमारे, भरत लोढा, शादाब खान, श्रीराम निकरट, विलास खैरे, परमेश्वर ढवळे, जगन्नाथ रासवे, पांडुरंग तरासे, नंदकिशोर जाधव, गोपाळराव मस्के, रामजी गाढवे, विजय बर्डे, बालाजी खरात, शुभम जाधव, भागवत खांडेभराड, गोविंद मदनुरे, अनिल वाजे, नारायण काकडे, सुदाम कोरडे, गोविंद अहिरे, शिवाजी माने, अशोक दिंडे, यांच्यासह अनेक पदाधिकारी, समता सैनिक, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
blank
blank

blank