38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News रितेश -जेनिलियची ताडोबात जंगल सफारी

रितेश -जेनिलियची ताडोबात जंगल सफारी

0
101

blank

चंद्रपूर-,चित्रपट अभिनेता रितेश देशमुख Ritesh deshmukh त्यांची पत्नी अभिनेत्री जेनिलिया मुलांसह मंगळवारी जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झालेत. बुधवारी सकाळपासून त्यांनी जंगल सफारी केली. पण, त्यांना दुपारपर्यंत व्याघ्र दर्शन झाले नाही.मंगळवारी सायंकाळी ताडोबा प्रकल्पाच्या खुटखुवंडा प्रवेशद्वारातून त्यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश केला. रितेश देशमुख यांच्यासोबत त्यांचे मित्रसुद्धा आहेत.ते मुधोलीलगतच्या लिंबन रिसॉर्टमध्ये मुक्कामी असून, त्यांचा मुक्काम किती दिवस राहणार, याबाबतची माहिती कळू शकली नाही.बुधवारी दोन जिप्सीद्वारे त्यांनी जंगल भ्रमंतीचा आनंद लुटला.पण, दुपारी 3 वाजेपर्यंत देशमुख कुटुंबियांना वाघोबाचे दर्शन
झाले नाही. त्यांच्या मित्रांच्या वाहनाला व्याघ्र दर्शन झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश शेंडे यांनी दिली. बुधवारी दिवसभर ते जंगल सफारी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

blank