
मोहाडी-तुमसर येथील व्यापारी भंडाराकडून तुमसरकडे कारने जात असताना मोहाडी शहराबाहेर असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयासमोर असलेल्या पोलिसांनी व्यापार्याला मारहाण करून कारमध्ये ठेवलेले ५0 लाख रुपये लुटल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिसात तशी तक्रार दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मोहाडी नगरपंचायत निवडणुक मतपेटी स्ट्रॉंग गार्ड महिला आर्थीक विकास महामहामंडळ (माविम) मोहाडी येथे आहे. त्यामुळे, तिथे पोलिसांचा बंदोबस्त आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री १0 वाजेच्या सुमारास ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अविनाश वसंत पटले रा. हसारा ता. तुमसर हे मित्र यासिन छव्वारे सोबत नागपुरवरून भंडारा मार्गे तुमसरकडे जात होते. तेवढय़ात समोरून एका पोलिसाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाकडे आपली दुचाकी वळविल्याने ‘इंडिकेटर का दिले नाही’ असे बोलले असता त्याने पोलिसी खाका दाखवीत त्यांना शिवीगाळ सुरू केली. एवढय़ावरच न थांबता माविम कार्यालयातील इतर पोलिसांना बोलावून मारझोड केली. व कारमध्ये असलेले ५0 लाख रुपये लुटले. अशी तक्रार पोलीस स्टेशन मोहाडी येथे करण्यात आली आहे. दरम्यान, रात्रीच आ. राजू कारेमोरे हे मोहाडी पोलीस ठाण्यात पोहचले व दोषी पोलिसांवर कारवाईची मागणीक केली आहे. तर दुसरीकडे संबंधित पोलिसांनीसुद्धा व्यापार्यांच्या विरुद्ध तक्र ार केली आहे.
काही दिवसांपूर्वी कारधा पोलिस ठाण्याच्या पोलिसांना जि.प. निवडणुकीच्या उमेदवाराकडील पैसे लुबाडल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले. त्यामुळे, आता हे प्रकरण कोणते वळण घेते, याकडे लक्ष लागून आहे.





