31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News 5 राज्यांमध्ये 7 टप्प्यात विधानसभा निवडणुका, 10 फेब्रुवारीला यूपीपासून सुरुवात, 10 मार्चला...

5 राज्यांमध्ये 7 टप्प्यात विधानसभा निवडणुका, 10 फेब्रुवारीला यूपीपासून सुरुवात, 10 मार्चला सर्व राज्यांचे निकाल

0
95

blank

कोरोना दरम्यान 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कडक प्रोटोकॉल पाळला जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले. 15 जानेवारीपर्यंत रोड शो, रॅली, पदयात्रा, सायकल आणि स्कूटर रॅलीला परवानगी दिली जाणार नाही. व्हर्च्युअल रॅलीद्वारेच निवडणुकीच्या प्रचाराला परवानगी असेल. विजयानंतर कोणतीही विजयी मिरवणूक काढली जाणार नाही.

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले की, देशातील 5 राज्यांच्या 690 विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. 18.34 कोटी मतदार या निवडणुकीत भाग घेतील. कोरोना दरम्यान निवडणुका घेण्यासाठी नवीन प्रोटोकॉल लागू केले जातील. सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळालेले असतील. ज्यांना गरज असेल त्यांनाही खबरदारीचे डोस दिले जातील.

कशा होतील निवडणुका…

पहिला टप्पा – १० फेब्रुवारी

सर्व राज्यांमधल्या निवडणुका एकूण ७ टप्प्यांमध्ये घेतल्या जातील. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी १४ जानेवारीला परिपत्रक काढलं जाईल. अर्ज भरण्याची तारीख २१ जानेवारी, मागे घेण्याची तारीख २७ जानेवारी असेल. तर मतदान १० फेब्रुवारीला होईल.

दुसरा टप्पा

या टप्प्यात ४ राज्यांमधे निवडणुका होतील. उत्तर प्रदेशचा दुसरा टप्पा, उत्तराखंड, पंजाब आणि गोव्याचा पहिला टप्पा. २१ जानेवारीला नोटिफिकेशन, अर्ज भरण्याची तारीख २८ जानेवारी, मागे घेण्याची मुदत ३१ जानेवारी तर मतदानाची तारीख १४ फेब्रुवारी असेल.

तिसरा टप्पा

या टप्प्यात फक्त उत्तर प्रदेशचा तिसरा टप्पा होईल. नोटिफिकेशन २५ जानेवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १ फेब्रुवारी, मागे घेण्याची मुदत ४ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २० फेब्रुवारी असेल.

चौथा टप्पा

या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. नोटिफिकेशन तारीख २७ जानेवारी, अर्ज भरण्याची तारीख ३ जानेवारी, मागे घेण्याची तारीख ७ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख २३ फेब्रुवारी असेल.

पाचवा टप्पा

यात उत्तर प्रदेशचा पाचवा आणि मणिपूरचा पहिला टप्पा यासाठी मतदान होईल. नोटिफिकेशन १ फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख ८ फेब्रुवारी असेल. मागे घेण्याची तारीख ११ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २७ फेब्रुवारी असेल.

सहावा टप्पा

या टप्प्यात उत्तर प्रदेश सहावा आणि मणिपूर दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका होतील. यात नोटिफिकेशन ४ फेब्रुवारी, अर्ज भरण्याची तारीख ११ फेब्रुवारी, मागे घेण्याची तारीख १६ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख ३ मार्च असेल.

सातवा टप्पा

उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी नोटिफिकेशन १० फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १७ फेब्रुवारी, अर्ज मागे घेण्याची तारीख २१ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख ७ मार्च असेल.

मतमोजणीची तारीख १० मार्च असेल.

उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयी माहिती मिळायला हवी. उमेदवारांना त्याची माहिती द्यावी लागेल. यासंदर्भात वर्तमानपत्र आणि टीव्ही वाहिन्यांवरून प्रचारादरम्यान तीन वेळा याविषयीची माहिती द्यावी लागेल. याशिवाय राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाईटवर होम पेजवर प्रत्येक उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती द्यावी लागेल. तसेच, याच उमेदवाराला का निवडलं, याचं कारण पक्षाला द्यावं लागेल. उमेदवाराची निवड झाल्यानंतर पुढच्या ४८ तासांत ही माहिती द्यावी लागेल.

आतापर्यंत 5 मोठ्या गोष्टी

1. कोरोना दरम्यान आव्हानात्मक निवडणुका – नवीन कोविड प्रोटोकॉल लागू केले जातील.

2. कोरोना बाधित देखील मतदान करू शकतील – रुग्णांना पोस्टल बॅलेट सुविधा.

3. 16% मतदान केंद्र वाढवण्यात आले आहेत. 2.15 लाखांहून अधिक मतदान केंद्रे बांधण्यात आली आहेत.

4. मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1500 ते 1250 मतदार.

5. निवडणूक खर्च मर्यादा वाढली, आता मोठ्या राज्यांमध्ये 40 लाख रुपये

राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

1. सर्व कार्यक्रमांची व्हिडिओग्राफी केली जाईल.

2. पक्षांना त्यांच्या उमेदवारांचे गुन्हेगारी रेकॉर्ड घोषित करावे लागेल.

3. उमेदवाराला गुन्हेगारी इतिहास देखील सांगावा लागेल.

4. प्रत्येक उमेदवार यूपी, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये 40 लाख रुपये खर्च करू शकेल.

5. मणिपूर आणि गोव्यात ही खर्च मर्यादा 28 लाख रुपये असेल.

या राज्यात विधानसभा निवडणूक होणार

पंजाब, गोवा, युपी, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यात यावर्षी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. भाजपने उत्तर प्रदेश विधानसभेसाठी कंबर कसली असून, भाजपचे अनेक दिग्गज नेते उत्तरप्रदेशमध्ये तळ ठोकून आहे.

blank