मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

0
13

अर्जुनी-मोर,दि.12- अर्जूनीमोर ते इटखेडा राज्य महामार्गवरील तावशी फाट्यावर आज(दि.12) दुपारी 4 वाजेच्या सुमारास एका मालवाहू मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली.

मालवाहूमोटार क्रमांक टी एस 28 जीए 50 98 चालकाने दुचाकी क्रमांक एम एच 35 ये एल 87 66 ला धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार महागाव येथील दीपक दादाजी देशमुख हे गंभीर जखमी तर प्रमोद धर्मा देशमुख हे जखमी झाले असून जखमींना ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोर येथे हलविण्यात आले आहे