यूपी निवडणूक:भाजपला धक्के मागे धक्के; स्वामी आणि दारानंतर धर्मसिंह सैनींचा राजीनामा

0
40

उत्तर प्रदेशात भाजप नेत्यांची बंडखोरी सुरुच आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका सहन करावा लागण आहे. आज पुन्हा योगी सरकारधील मंत्री धर्मसिंह सैनी यांनी योगी सरकारला रामराम ठोकले आहे. तीन दिवसांत आतापर्यंत तीन मंत्र्यांनी यूपी सरकारला आपला राजीनामा दिला आहे. या आधी स्वामी प्रसाद मौर्या आणि दारा सिंह यांनी देखील आपला राजीनामा पक्षाला सुपुर्द केला आहे.

आज धर्मसिंह सैनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्यापुर्वी भाजपच्या आणखी दोन आमदार मुकेश वर्मा आणि विनय शाक्य यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मुकेश शर्मा हे शिकोहाबाद येथून आमदार आहेत, तर विनय शाक्य हे बिधुना या मतदार संघातील आमदार आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन दिवसात 10 आमदारांनी भाजपला रामराम ठोकले आहे.

दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 50 महिलांचा समावेश आहे. चकीत करणारे नाव म्हणजे उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईचे आहे. प्रियंका गांधींनी त्यांना उन्नावमधून उमेदवारीही दिली आहे. त्याचवेळी लखीमपूरमधील चीअर हरण घटनेतील पीडित रितू सिंह यांनाही मोहम्मदी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, पंखुरी पाठक यांनाही नोएडामधून उमेदवारी देण्यात आली आहे.हस्तुनापूरातून बिकनी गर्ल्सच्या नावाने प्रसिद्ध अर्चना गौतमला देखील मैदानात उतरवले आहे. अर्चनाने 2018 मध्ये मिस बिकनी किताब जिंकला होता.