जिल्ह्याचा विकास व शेतकरी हितासाठी राष्ट्रवादीलाच मतदान द्या – खासदार प्रफुल पटेल

0
40

गोंदिया– जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तसेच नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिरोडा तालुक्यातील बिर्सी फाटा व चिखली येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत भेट कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलतांना श्री पटेल म्हणाले की, मतदान प्रक्रियेत मतदारांनी सहभाग घेवून कोणत्याही भुलथापाला बळी न पडता जिल्हाचा विकास व शेतकर्‍याच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करून बहुमताने विजय करा, असे आवाहन श्री प्रफुल पटेल यांनी केले. शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळविण्यासाठी सतत प्रयत्नरत राहून शेतकर्‍यांना योग्य दाम मिळवून दिला. त्यामुळे मागील २ वर्षापासून प्रतिक्विंटल धानाला २५०० रुपया पेक्षा अधिक भाव मिळत आहे. यंदाही धानाला निश्चितपणे बोनस मिळवून देण्याची ग्वाही श्री पटेल यांनी यावेळी दिली. त्यामुळे शेतकर्‍यांनी बोनस बाबत चिंता करण्याची गरज नाही, विरोधक फक्त भुलथापा देण्याचे काम करीत आहेत. ज्यांनी ५ वर्ष सत्ताभोग केले मात्र जिल्ह्याचा विकास तिळमात्रही केला नाही. जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांना गती देण्याचे काम करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोणातून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. या निवडणुकीत मतदारांनी सर्व बाबींचा विचार करून भुलथापा देणार्‍यांना धडा शिकवावा. विकास व शेतकर्‍यांच्या हितासाठी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून बहुमताने विजयी करावे, असे आवाहन खासदार पटेल यांनी केले आहे.प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री माजी खासदार खुशाल बोपचे, योगेंद्र भगत, राज लक्ष्मी तुरकर, प्रेम रहांगडाले, रविकांत बोपचे, मनोज डोंगरे, दिलीप कावरे, गजानन बिसेन, वाय टी कटरे, नीता रहांगडाले, सविता पटले, सीमा कटरे, जया धावडे, रामसागर धावडे, कैलास पटले, संदीप मेश्राम, भूपेंद्र पटले, मुन्ना बिनझाडे, नंदकिशोर शरणागत, मायाताई शरणागत, चित्रलेखा चौधरी, खेमेंद्र चौधरी, टेकलाल सोनवाने, किरण वैद्य, अरुण कढव, देवेंद्र चौधरी, सहित पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.