31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ स्वच्छ सुंदर-माझे गाव अभियानातंर्गत रविवारला श्रमदानातून स्वच्छता

स्वच्छ सुंदर-माझे गाव अभियानातंर्गत रविवारला श्रमदानातून स्वच्छता

0
44

गोंदिया,दि.17ः-‘स्वच्छ सुंदर- माझे गाव’ अभियाना अंतर्गत (ता.१६) सकाळी ७-९ वाजता दरम्यान श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. उपक्रमात सहभागी सेंटर पॉइंट चौक ग्राम पंचायत कार्यालयाच्या परिसरासमोर, आठवडी बाजार, रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, प्राथमिक शाळा व अंगणवाडी टिकायतपुर बस स्टॉपवरील परिसर व पोलीस स्टेशन गंगाझरीचा परिसर स्वच्छ केला.
या अभ्यिानात सरपंच सोनुभाऊ विनायक घरडे, सदस्य राजेश कटरे, संदीप कावळे, सैनिक मुकेश उईके, राजु चीचखेडे, महेशभाऊ बबरिया, विनोद कोहपरकर, लखन नागभिरे, शिवभाऊ लिल्हारे, मुस्तकिंमभाई पठाण, छगण लिल्हारे, लोकेश धरमसिंह नागभिरे, संदीप मरशकोल्हे, विशाल उके आदिंनी सहभाग घेतला होता. माझे गाव सुंदर गाव या अभियानातंर्गत गाव परिसरातील स्वच्छता करण्यात आली. दरम्यान कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली. गावातील लहान मुले ज्यांच्यात स्वच्छते विषयी आवड व आकर्षण आहे असे आर्यन ब्रह्मराज बबरिया व चैतन्य मनोज कुंभरे,सौरभ अरविंद लिल्हारे, गट्टू संजू लिल्हारे, प्रियांशु बबरिया, शविन अनिल घरडे सहभागी होवून श्रमदान केले.
अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांचा गंगाझरीचे सरपंच वतीने आभार व्यक्त केला. त्याचप्रमाणे पुढच्या रविवारला जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.