31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता रेल्वे मालगाडीच्या धडकेत विद्युत कर्मचारी ठार

रेल्वे मालगाडीच्या धडकेत विद्युत कर्मचारी ठार

0
126

तिरोडा, दि.18 : रेल्वे मालगाडीच्या धडकेत विद्युत कर्मचारी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घोगरा-पाटीलटोला शिवारात आज मंगळवार, 18 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 9:30 वाजताच्या दरम्यान घडली. नामदेव दत्ता घुले (वय 38) असे मृताचे नाव आहे.
मृतक नामदेव घुळे हे मुंडीकोटा येथे भाड्याने राहत होते. ते विद्युत कंपनीमध्ये लाईनमन पदावर कार्यरत होते. रेल्वे मालगाडीच्या धडकेत (अपघातात) त्यांच्या पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात पाटीलटोला शिवारात पोल क्रमांक 104214 ते 104216 च्या मध्यभागी घडला.
रेल्वे पोलीस व तिरोडा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक योगेश पारधी, विद्युत अभियंता भैसारे व विद्युत कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.