गोंदिया जिल्हा परिषद भाजप 26,काँग्रेस 13,राँका 8,चाबी 4,अपक्ष 2 जागांवर विजयी,5 पंचायत समित्या भाजपकडे

0
807

गोंदिया गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 व भंडारा जिल्हा परिषेच्या 52 जागासाठी व पंचायत समितीच्या अनुकमे 106 व 104 आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली असून निकाल हाती येऊ लागले आहे.पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजुने गेलेला होता.मात्र भारतीय जनता पार्टीने 26 जागा जिंकत सर्वात मोठी पार्टी होण्याचा मान पटकावला मात्र बहुमतासाठी 1 जागा कमी पडली.यात दोन अपक्ष निवडून आलेले हे भाजपचे बंडखोर असल्याने त्यांची मनधरनी करावी लागणार आहे.आत्तापर्यत काँग्रेस 13,चाबी 4, 8 राष्ट्रवादी व अपक्ष 2 जागा जिंकली आहे. गटनिहाय मतमोजणीला सुरवात करण्यात आली आहे.गोंदिया जिल्हा परिषदेच्या 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 20,भारतीय जनता पार्टी 17 व काँग्रेसने 16 जागा मिळवल्या होत्या.गोंदिया तालुक्यातील बिरसोला ही जागा राष्ट्रवादीच्या नेहा केतन तुरकर यांनी जिंकली असून राष्ट्रवादीचे नेेते माजी आमदार राजेंद्र जैन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
.अर्जुनी मोरगाव(7 जि.प.गट),गोंदिया-(14 जि.प.गट),गोरेगाव-(6 जि.प.गट),सडक अर्जुनी-(5 जि.प.गट),तिरोडा(6 जि.प.गट),आमगाव(5 जि.प.गट),देवरी(6 जि.प.गट),सालेकसा(4 जि.प.गट)-पोस्टलनंतर मतमोजणीला सुरवात झालेली गोंदिया तालुक्यातील पहिला निकाल लवकरच
उल्लेखनीय म्हणजे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचा गड असलेल्या डव्वा जिल्हा परिषद क्षेत्रात या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला बाजूला सारून भाजपला संधी दिली. भाजपचे डाॅ. भूमेश्वर पटले निवडून आले. डव्वा जिल्हा परिषद क्षेत्राच्या निकालाकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून होते. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, भारतीय जनता पक्षाकडून डॉ. भुमेश्वर पटले, काँग्रेसकडून दिनेश हुकरे रिंगणात ऊभे होते. खरी लढत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच होती. परंतु, काँग्रेसचे दिनेश हुकरे यांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली. अखेर चुरशीच्या या सामन्यात भाजपचे डाॅ. भूमेश्वर पटले विजयी झाले. येथून गंगाधर परशुरामकर यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. या क्षेत्रातून भाजपने पहिल्यांदा विजय मिळविला, हे विशेष.
तिरोडा तालुक्यातील सेजगाव जिल्हा परिषद क्षेत्रातून राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यात. येथे भाजपचे पवन किशोरीलाल पटले विजयी झाले. त्यांनी काॅंग्रेसचे उमेदवार ओमप्रकाश राधेलाल पटले यांचा पराभव केला. गोरठा जिल्हा परिषद क्षेत्रातून काँग्रेसच्या छबूताई महेश ऊके विजयी झाल्यात. त्यांनी भाजपचे हरिहर केशवराव मानकर यांचा पराभव केला. गोरेगाव तालुक्यातील सोनी जिल्हा परिषद क्षेत्राातून भाजपचे पंकज रहांगडाले विजयी झाले. त्यांनी काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव पी. जी. कटरे यांचा पराभव केला. शहारवाणी जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपचे माजी सभापती मोरेश्वर कटरे यांचा पराभव झाला. येथे काँग्रेसचे जितेंद्र कटरे विजयी झाले.  एकंदरीत मतदारांनी दिग्गज नेत्यांना नाकारून नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसते. जिल्हा परिषद निवडणूक निकालाचा पहिला कल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने,बिरसोला मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार नेहा तुरकर विजयी झालेल्या आहेत.अर्जुनी जिल्हा परिषद गटातून भाजपचे चतुर्भूज बिसेन तर परसवाडा पंचायत समित गणातून हुपराज जमईवार विजयी झालेले आहेत.
घाटटेमणी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुरेश हर्षे विजयी झाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधा रहागंडाले या पांढरी जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या आहेत.त्यानी माजी जिप उपाध्यक्ष छाया चव्हाण यांचा पराभव केला.
शहरावाणी गटातून काँग्रेसचे जितेंद्र कटरे यांनी भाजपचे मोरेश्वर कटरे यांचा पराभव केला.
पांजरा जिल्हा परिषद गटातून भाजप उमेदवार हेमलता ओमप्रकाश चिचाम विजयी झाल्या आहेत.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात आत्ता पोस्टल मोजणी संपल्याने पहिला निकाल यायला उशीर लागणार आहे.
सालेकसा तालुक्यात पिपरीया येथे काँग्रेसच्या श्रीमती नागपूरे या आघाडीवर आहेत.
तिरोडा तालुक्यातील सेजगाव जिल्हा परिषदेचे क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पवनभाऊ पटले 477 मतांनी विजयी झाले.त्यांनी काँग्रेसचे ओमप्रकाश पटले यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर या तिसर्या क्रमांकावर राहील्या.
गोंदिया तालुक्यात चाबी संघटनेने पहिली जागा काटी मतदारसंघातून पंचायत समितीसह जिंकून आपला खाता उघडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जगदीश बालू बावनथडे सुकळी जिल्हा परिषद गटातून विजयी माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले यांचा केला पराभव.
पुराडा मतदारसंघातून माजी आमदार संजय पुराम यांच्या पत्नी व माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम विजयी झाल्या आहेत,त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला.
सोनी मतदारसंघातून काँग्रेसचे मात्तब्बर नेते पी.जी.कटरे यांचा युवा उमेदवार पंकज रहागंडाले यांनी पराभव करीत विजय मिळवला आहे.
डव्वा जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व मात्तबर नेते गंगाधर परशुरामकर यांचा डाॅ.भुमेश्वर पटले यांनी पराभव केला.
भाजपने उमेदवारी नाकारलेले नागरा जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार रुपेशकुमार(सोनू)कुथे हे विजयी झाले आहेत.ते माजी आमदार रमेश कुथे यांचे चिरंजिव आहेत.
जिल्हा परिषद गोंदिया विजयी उमेदवार 53(भाजपा – 26, काँग्रेस – 13, राका – 8, अपक्ष 6(चाबी- 4, अपक्ष -2)
गोंदिया- 14 सीट(भाजपा – 6, राका – 3, अपक्ष (चाबी) – 4, अपक्ष -1)
1. बिरसोला- सर्वसाधारण (महिला) : नेहा तुरकर – राका
2. पांजरा- अनु. जमाती (महिला) : वैशाली पंधरे – अपक्ष (चाबी)
3. काटी- अनु. जमाती : अनंदा वाढीवा – अपक्ष (चाबी)
4. धापेवाड़ा- अनु. जमाती : विजय उईके – भाजपा
5. पांढराबोडी- अनु. जमाती (महिला) : शांताबाई देशभ्रतार – भाजपा
6. कामठा- अनु. जमाती : रितेश मलगाम – भाजपा
7. नागरा- सर्वसाधारण – रुपेश(सोनू)कुथे – अपक्ष (टोपली)
8. रत्नारा- सर्वसाधारण (महिला) – अंजली अटरे – भाजपा
9. एकोडी- सर्वसाधारण (महिला) : अश्विनी पटले- राका
10. पिंडकेपार- अनु. जाती (महिला) : दीपा चन्द्रिकापुरे – अपक्ष (चाबी)
11. कुड़वा- अनु. जमाती : पूजा सेठ – राका
12. आसोली- सर्वसाधारण (महिला) : लक्ष्मी तरोने – भाजपा
13. खमारी- अनु. जमाती (महिला) : ममता वाळवे – अपक्ष (चाबी)
14. फुलचुर- सर्वसाधारण : योपेंद्रसिंग(संजय) टेंभरे – भाजपा
——————————–
आमगांव- (5) (भाजपा – 2, काँग्रेस -2, राका – 1)
15. घाटटेमनी- सर्वसाधारण : सुरेश हर्षे – राका
16. किकरीपार : किशोर महारवाडे – भाजपा
17. गोरठा- सर्वसाधारण (महिला) : छबूताई उके – काँग्रेस
18. ठाणा- अनु. जमाती : हनुवट वट्टी – भाजपा
19. अंजोरा- सर्वसाधारण (महिला) – उषाताई मेंढे – काँग्रेस
———————————-
सालेकसा- (4) (काँग्रेस – 4)
20. झालिया- सर्वसाधारण (महिला) : छाया नागपुरे – काँग्रेस
21. पिपरिया- सर्वसाधारण (महिला) : गीता लिल्हारे – काँग्रेस
22. तिरखेड़ी- सर्वसाधारण(महिला) : विमल कटरे – काँग्रेस
23. कारूटोला- सर्वसाधारण (महिला): वंदना काळे – काँग्रेस
———————————–
गोरेगाव- (6) (भाजपा – 4, काँग्रेस – 2)
24. शहारवाणी- सर्वसाधारण : जितेंद्र कटरे – काँग्रेस
25. सोनी- सर्वसाधारण : पंकज रहांगडाले – भाजपा
26. घोटी- अनु. जमाती (महिला) : प्रीती कतलाम – भाजपा
27. कुऱ्हाडी – अनु. जाती : शैलेश नंदेश्वर – भाजपा
28. मुंडिपार- सर्वसाधारण : लक्ष्मण भगत – भाजपा
29. निम्बा- सर्वसाधारण : शशी भगत – काँग्रेस
————————————-
तिरोडा- ( 7)(भाजपा – 5, राका – 2)
30. अर्जुनी- सर्वसाधारण : चतुर्भुज बिसेन – भाजपा
31. सेजगाव- सर्वसाधारण : पवन पटले – भाजपा
32. सुकड़ी- सर्वसाधारण : जगदीश बावनथडे – राका
33. ठाणेगाव- सर्वसाधारण (महिला) : माधुरी रहांगडाले – भाजपा
34. कवलेवाडा- सर्वसाधारण : किरण पारधी – राका
35. सरांडी- अनु. जमाती (महिला) : रजनी कुंभरे – भाजपा
36. वड़ेगाव- सर्वसाधारण (महिला) :तुमेश्वरी बघेले -भाजपा
———————————–——-
सड़क अर्जुनी- (5) ( भाजपा – 4, राका – 1)
37. पांढरी- सर्वसाधारण (महिला) : सुधा रहांगडाले – राका
38. डव्वा- सर्वसाधारण : डॉ भुमेश्वर पटले – भाजपा
39. सौंदड़- अनु. जमाती (महिला) : निशा तोडासे – भाजपा
40. चिखली- सर्वसाधारण (महिला) :कविता रंगारी -भाजपा
41. शेन्डा- सर्वसाधारण (महिला) : चंद्रकला डोंगरवार – भाजपा
——————————————
देवरी- (5)(भाजपा – 2, काँग्रेस -3)
42. पुराड़ा- सर्वसाधारण (महिला): सविता पुराम – भाजपा
43. गोटाबोडी- अनु. जाती (महिला) कल्पना वालोदे – भाजपा
44. भर्रेगाव- सर्वसाधारण : संदीप भाटिया – काँग्रेस
45. ककोडी- अनु. जाती : उषाबाई शहारे – काँग्रेस
46. चिचगड- सर्वसाधारण (महिला) : राधिका धरमगुळे – काँग्रेस
——————————————-
अर्जुनी/मोरगाव- (7)(भाजपा -3, काँग्रेस -2, राका -1, अपक्ष -1)
47. गोठनगाव- अनु. जाती : यशवंत गणवीर – राका
48. नवेगांवबांध- सर्वसाधारण (महिला) : रचनाताई गहाणे – भाजपा
49. बोंडगावदेवी- सर्वसाधारण : लायकराम भेंडारकर – भाजपा
50. माहुरकूड़ा- सर्वसाधारण(महिला) : सुनीता कापगते – काँग्रेस
51. ईटखेडा- सर्वसाधारण(महिला) : पौर्णिमा ढेंगे – अपक्ष
52. महागाव- सर्वसाधारण (महिला) : जयश्री देशमुख – भाजपा
53. केशोरी- सर्वसाधारण : श्रीकांत घाटबांधे – काँग्रेस

8 पैकी 5 पंचायत समितीवर भाजपचे बहुमत 1 सालेकसा काँग्रेसचे बहुमत
अर्जुनी मोरगावमध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत नाही मोठा पक्ष भाजप

महत्वाची गोंदिया पंचायत समितीमध्ये सुध्दा कुणालाच स्पष्ट बहुमत नाही
भाजप 10 व चाबी संघटनेला 10 जागा आहेत

गोंदिया पंचायत समिती 28 जागा (गोंदियात पंचायत समितीत स्पष्ट बहुमत नाही)
भाजप 10,चाबी 10, राष्ट्रवादी काँग्रेस 5,अपक्ष 2,बसपा 1 विजयी

तिरोडा पंचायत समिती 14 जागा( तिरोडा पंचायत समितीवर भाजपचे बहुमत)
राष्ट्रवादी 3, काँग्रेस 1, भारतीय जनता पार्टी 9, प्रहार जनशक्ती पार्टी 1

गोरेगाव पंचायत समिती (12 जागा) भाजपचे बहुमत स्पष्ट
भाजप 10 व काँग्रेस 2

देवरी पंचायत समिती 10 जागा भाजप बहुमत
भाजप 6 काँग्रेस 4 विजय

सालेकसा पंचायत समिती 8 जागा (काँग्रेस बहुमत)
भाजप 2 काँग्रेस 6 जागा विजय

आमगाव पंचायत समिती 10 जागा(भाजप बहुमत)
काँग्रेस 2 ,भाजप 7, राष्ट्रवादी काँग्रेस 1 विजयी

सडक अर्जुनी पंचायत समिती 10 जागा (भाजप बहुमत)
भाजप 7 काँग्रस 1 एनसीपी 2 विजयी

अर्जुनी मोरगाव पंचायत समिती 14 जागा (स्पष्ट बहुमत नाही)
काँग्रेस 4 ,भाजप 6 राष्ट्रवादी 2,वंचित आघाडी 1,अपक्ष 1 विजयी