देवरी पंचायत समिती भाजपच्या ताब्यात

0
45

भाजप 6, कॉंग्रेस 4  तर राष्ट्रवादीला खाते ही उघडता आले नाही.

देवरी,दि.19- नुकत्याच झालेल्या देवरी पंचायत समितीच्या निवडणूकीची मतगणना आज स्थानिक औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेत पूर्ण करण्यात आली. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक म्हणजे 6 जागांवर यश मिळविले असून कॉंग्रेसच्या खात्यात 4 जागा आल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेनेला आपले खाते उघडता आले नाही.

83- आोवारा मतदार संघात भाजपच्या वैशाली पंधरे या विजयी झाल्या.त्यांनी कॉग्रेसच्या रता नंदलाल नेताम यांचा  1 हजार 47 मतांनी पराभव केला.

84- पुराडा मतदार संघात भाजपच्या ममता अंबादे आणि कॉंग्रेसच्या  अर्चना साखरे यांच्यात लढत झाली. या लढतीत अंबादे यांनी साखरे यांचा770 मतांंनी पराभव केला. तर अपक्ष आशा मेश्राम यांनी 981 मते घेत भाजपचा मार्ग सुकर केला.

85- गोटाबोडी मतदार संघातील निवडणुकीच्या निकालावर सर्वांचे लक्ष लागून होते. यामध्ये भाजपचे अनिल दसाराम बिसेन यांनी बाजी मारली. बिसेन यांनी कॉंग्रेसचे अविनास टेंभरे यांना 1 हाजर 416 मतांनी पराभऊत केले.

86- मुरदोली गणात भाजपच्या  शामकला विठ्ठल गावळ यांनी कॉंग्रेसच्या उर्मिला डोये यांचा 121 मतांनी पराभव केला. या गणात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मतांत फूट पडल्याचा फायदा भाजपने उचलला. गेल्या टर्म मध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात होती, हे विशेष.

87- भर्रेगाव या गणात कॉंग्रेसचे  प्रल्हाद बळीराम सलामे यांना 2 हजार  501 मते मिळाली. त्यांनी भाजपचे संजय जाळे यांचा 756 मतांनी पराभव केला.

88- परसोडी गणामध्ये भाजपच्या अंबिका प्यारेलाल बंजार यांनी क़ॉंग्रेसचे सदाराम बागडेहरिया यांचा 406 मतांनी पराभव केला. येथे राष्ट्रवादीचे रुपेशकुमार राऊत यांनी 1 हजार6 मते पडली.

89- केशोरी मतदार संघात कॉंग्रेसच्या भारती सलामे यांनी 1 हजार 817 मते मिळवली. तर माजी सभापती आणि भाजपच्या उमेदवार देवकी मरई यांना 1 हजार 580 मते घेऊन पराभवाला सामोरे जावे लागले. येथेही राष्ट्रवादीच्या  कविता उईके यांनी 1 हजार 57 मते घेतली.

90 ककोडी गणात  राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अनुसया सलामे यांनी भाजपच्या अनिता सेवता यांचा तब्बल 1151 मतांनी पराभव केला. येथेही राष्ट्रवादीच्या रंजनाबाई उइके यांनी 1130 मते घेतली.

91 चिचगड मतदार संघात कॉंंग्रेसचे रंजीत कासम यांनी भाजपचे धनराज कोरोंडे यांचा 350 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी सभापती इंदल अरकरा 1307 मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

92 पांलादूर मतदार संघातून भाजपचे शालीकराम गुरनुले हे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे राजिकखान यांचा 190 मतांनी पराभव केला. उल्लेखनीय म्हणजे या मतदार संघात महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मतांची बेरीज ही 3134 होत असल्याने भाजपचा विजय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.