
भंडारा,-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या बौद्धिक पातळीची उंची सांगणारे आहे. पटोले यांच्या विरोधात सर्वत्र तक्रारी दाखल झाल्या मात्र अजूनही गुन्हा दाखल करून अटक झालेली नाही. पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाखाली वावरत असून पटोले यांना अभय आहे. तर दुसरीकडे पटोले हे बनावट व्यक्तीला पुढे आणून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस प्रशासनाने जनतेची ते दिशाभूल न करता पटोलेंवर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयीन मार्गाने पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडून असा इशारा खासदार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याची आवड असलेल्या नाना पटोले यांना आपण काय बोलतो याचे भानही राहत नाही. जिल्ह्यात एका प्रचारसभे नंतर लोकांशी संवाद साधताना पटोले यांनी मोदीला मारू शकतो आणि शिव्या देण्याची भाषा बोलली. Nana Patole पटोले यांचे वक्तव्य संपूर्ण देशवासीयांच्या जिव्हारी लागणारे होते.ते पंतप्रधान पदाचा मान न राखणाऱ्या पटोले यांच्या विरोधात राज्यभर भाजपा कार्यकर्य र्ते आक्रमक झाले. मी स्वतः असंख्य कार्यकर्त्यांसह भंडारा पोलीस ठाण्यात पटोले यांचे विरोधात 17 जानेवारीला तक्रार दाखल केली. परंतु अजूनही पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांकडून हे प्रकरण वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणूक आयोगाला मध्ये आणून दिशा भरकटविण्याचा प्रकार पोलीस करीत असल्याचा आरोप खा. मेंढे यांनी केला. एकीकडे
मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात अपशब्द काढल्याच्या कारणावरून एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करीत सुडाचे राजकारण करणारे पोलिस खाते पटोले यांच्या बाबतीत मात्र काहीच करताना दिसत नाही. जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांवर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव असल्याचे यातून दिसून येते.ते कारवाई करण्याऐवजी त्यांची बाजू सावरून नेण्याच्या दृष्टीने पोलिस खाते प्रयत्न करताना दिसत आहे.आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारण्यासाठी पटोले यांनी बनावट मोदीचा देखावा केला. पोलीस आता त्याच्या मागे फिरत आहे. पटोले यांच्याकडून उमेश घरडे नामक व्यक्तीला माध्यमांसमोर आणून हाच तो बनावट मोदी हे भासविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यावर एकही
गुन्हा दाखल नाही. जो फारसा गावात राहत नाही असा गावगुंड कसा आणि तो पटोले यांच्या प्रचाराला न येण्याचे कारण काय? याचा अभ्यास पोलिसांनी केल्यास पटोले यांच्या वक्तव्यातील मोदी कोण हे स्पष्ट होईल. या बनावट मोदीला पैशाचे लालच देऊन उभे करण्यात आले असल्याची शंकाही खा. मेंढे यांनी बोलून दाखविली. पत्रकार परिषदेला माजी आमदार चरण वाघमारे, बाळा कशीवार, मुकेमुकेश थानथराटे, प्रशांत खोब्रागडे उपस्थित होते.




