आलेवाडा येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा वाचनालयाचे उदघाटन

0
21

देवरी,दि.27ः-प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देवरी तालुक्यातील आदिवासीबहुल क्षेत्रात असलेल्या आलेवाडा येथे स्थानिक युवकांच्या सहयोग व लोकसहभागातून स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी,क्रांतिसूर्य बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनलयाचे उदघाटन करण्यात आले.
या वाचनालयाचे उद्धघाटन आमगाव- देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चेतन उईके,कुलदीपजी लांजेवार (अध्यक्ष- दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी),तर प्रमुख अतिथी म्हणून गीताताई सयाम (सरपंच- ग्रा.पं. आलेवाडा),प्रल्हाद कुंभरे (उपसरपंच ),चिंतामण मडावी(अध्यक्ष-वाचनालय व्यवस्थापन समिती) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी या वाचनालयाला काही पुस्तके भेट स्वरूपात दिल्या.ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने भविष्याचा विचार करून समजासाठी एक मोठं पाऊल उचलणाऱ्या सर्व युवक-युवतींचे पाहुण्यांनी अभिनंदन केले.