40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राष्ट्रीय देश रामरहिम याची सुटका हा निव्वऴ योगायोग- मुख्यमंत्री खट्टर

रामरहिम याची सुटका हा निव्वऴ योगायोग- मुख्यमंत्री खट्टर

0
34

blank

चंडीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा तुरुंगातून बाहेर आला आहे. हरियानातील भाजप सरकारने त्याला 21 दिवसांचा फर्लो रजा मंजूर केली आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या गुन्हेगाराचा वापर निवडणुकीसाठी करुन घेण्यासाठी भाजपने त्याची सुटका केल्याचा आरोप होत आहे. हा आरोप मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी फेटाळून लावत रामरहिम याची सुटका हा केवळ योगायोग असल्याचे म्हटले आहे.

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने राम रहीमच्या सुटकेचा संबंध विधानसभा निवडणुकीशी जोडला आहे. मुख्यमंत्री खट्टर यांनी मात्र, याचा निवडणुकीशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. फर्लो रजा मंजूर होणे हा दोषीचा हक्क असतो, असा खुलासाही त्यांनी केला आहे. राम रहीमची सुटका आणि निवडणुका या केवळ योगागोय आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केलेआहे. मुख्यमंत्री खट्टर म्हणाले की, तीन वर्षे शिक्षा भोगलेल्या दोषीताल फर्लो रजेसाठी अर्ज करता येतो. याला प्रशासनासह पोलीस आणि न्यायालयाची मंजुरी आवश्यक असते. देशाची राज्यघटना आणि कायदा व्यवस्था यानुसार निर्णय होतात. ही कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया असते. फर्लो रजेवर तुरुंगातून बाहेर येणे हा प्रत्येक दोषीचा अधिकार असतो.

राम रहीमचे पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशात या दोन्ही राज्यात राम रहीमचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. त्यामुळे त्याला 21 दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. भाजपने राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढून मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. मागील दशकभरापासून राम रहीम हा तुरुंगात आहे. त्यामुळे तो आता तुरुंगातून बाहेर पडून थेट प्रचारात उडी घेण्याची शक्यता आहे.

साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये सुनावली होती. नंतर 2021 मध्ये त्याला 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. डेरा व्यवस्थापक रणजितसिंग यांच्या खून प्रकरणात राम रहीम आणि चौघांना केंद्रीय विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. राम रहीम 13 लाख रुपये तर इतर चौघांना 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रणजितसिंग याचा 2002 मध्ये खून करण्यात आला होता.

blank