तिरोडा,दि.14ः- तालुक्यातील ठाणेगाव येथे क्षत्रिय चक्रवर्ती राजा भोज पोवार समाज व ग्रामवासीयांतर्फे चक्रवर्ती सम्राट राजाभोज जयंती समारोह निमित्ताने मूर्ती अनावरण, भव्य शोभा यात्रा यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या जयंती समारोह प्रसंगी प्रबोधनपर व मनोरंजनास्तव आयोजित ऑक्रेस्टाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या कार्यक्रमाप्रसंगी समाजाची कुलदेवी माता गडकालिका व क्षत्रिय चक्रवर्ती महाराजा राजा भोज यांची पूजाअर्चना करण्यांत आली. यानिमित्ताने अभिवादन केले व जयंती निमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी रविकांत बोपचे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असतांना सम्राट राजभोज यांच्या विकासात्मक, पराक्रमी जीवनाविषयी उलगडा करून दिला व महाराजांच्या जीवनातून समाजाला वर्तमान परिस्थिती पाहता खरं बोध घेण्याची व आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. यावेळी उद्घाटक म्हणून जि.प.सदस्य किरण पारधी यांच्यासह जि.प.सदस्या तुमेश्वरीताई बघेले,खेमराज पटले,राज सोनेवाने, भगत, पारधी,दिलीप पारधी, छगनलाल कटरे, के एस पटले, आय टी पटले, दिनेश भगत, अनिल शहारे, सौ. विद्याताई बिसेन, उरकुडा पारधी, राजुभाऊ पटले आदिंसह समाजातील प्रतिष्ठित मान्यवर व गावकरी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.





