34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राष्ट्रीय देश संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन

संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन

0
42

blank

प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले आहे. मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. ते 69 वर्षांचे होते. बप्पी लाहिरी यांना संगीत क्षेत्रातील डिस्को किंग म्हटले जात होते. त्यांचे खरे नाव आलोकेश लाहिरी होते. बप्पी लाहिरी हे त्यांच्या संगीतासोबतच सोन्याचे दागिणे घालण्याच्या शैलीसाठी देखील ते ओळखले जात होते. 1980-90 च्या दशकात ते लोकप्रिय झाले होते. 2014 मध्ये पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.

blank