34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News व्हॅन-ट्रॅक्टर अपघातात चार ठार, नऊ जखमी

व्हॅन-ट्रॅक्टर अपघातात चार ठार, नऊ जखमी

0
91

blank

नागपूर-लग्न आटोपून परत येत असताना सोयता फाट्याजवळ वाशीम-शेलुबाजार मार्गावर एमएच ४८ पी १४४५ महिंद्रा मॅक्झीमो व्हॅन या गाडीने उभ्या एमएच ३७ व्ही ३२५८ या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यामध्ये ४ ठार व ९ जखमी झाले. मृत्यूमध्ये एकाच परिवारातील आई-वडील, दहा वर्षीय मुलगा व १२ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या गाडीमध्ये १३ जण प्रवास करीत होते.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासन व साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन पथक, पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक व शासकीय १0८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन जखमींना वाशीम येथे रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी वाशीम येथील पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, गोरख भामरे, महक स्वामी, उपविभागीय अधिकारी पांडे, ठाणेदार अजिनाथ मोर यांनी भेट दिली. वृत्त लिहिस्तोवर मृतांची व जखमींची नावे कळू शकली नाही.

blank