40.6 C
Gondiā
Monday, June 15, 2026
Home राजकीय नाना पटोलेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ…काय म्हणाले?

नाना पटोलेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ…काय म्हणाले?

0
129

blank

भंडारा,दि.16ः- Nana Patole सरकारमध्ये जे काही चालले आहे त्यात बदल करण्याची वेळ आली आहे.दहा मार्च नंतर हे बदल होतील, असेच संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. काँग्रेस कमिटीच्या वतीने भंडारा येथे काही लोकांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते.ते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे सूचकसू वक्तव्य केले. पाच राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. माझे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले आहे. जे काही सरकारमध्ये चालले आहे, त्यात 10 मार्च नंतर दुरुस्ती करण्यात येईल व नवीन बदल सरकार मध्ये पहायला मिळतील असे सांगून नाना पटोले यांनी एक प्रकारे दहा मार्च नंतर मोठा राजकीय भूकंप येण्याचे संकेत दिले आहेत.

Nana Patole नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना ऊत येऊन पटोले चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्च नंतर सरकार बदलेल असे वक्तव्य केले होते त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. काल भंडारा (Bhandara) जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये (Congress) मेगाभरती झाली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.ते नानांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. १० मार्चनंतर नाना पटोले मोठा राजकीय भुकंप तर करणार नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. नाना (Nana Patole) नक्की करणार काय, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांचा पत्रकार परीषेदत संजय राऊत यांनी भाजपाच्या लोकांवर जे गंभीर आरोप केले त्याबाबात आम्ही संजय राउत यांच्या समर्थनात आहो असे वक्तव्य नांना पटोले यांनी केले.मात्र काल भाजप नेत्यांवर टिका करतांना ज्या शब्दाचा उपयोग केला गेला आहे, त्याचे समर्थन आम्ही करत नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही चुकीच्या भाषेच कधी समर्थन करीत नाही.मात्र भाजपचे आसाम येथील मुख्यमंत्री यांनी जी भाषा वापरली त्याच भाजप मात्र समर्थन करीत आहे.मुंबईत भाजपाने जो धिंगाणा घातला तो मुंबईकरांना चांगलच ठाऊक आसल्याचे नांना बोलले.हिंसेच काँग्रेस कधीच समर्थन करीत नाही,मात्र मातृत्वावर जे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भाषा वापरली त्यांच काय?असा सवाल ही त्यांनी केला आहे.