सडक अर्जुनी,दि.25ः-तालुक्यातील डव्वा येथे रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पंचायतीच्यावतीने पांदन रस्ता कामाची सुरवात जिल्हा परिषद सदस्य डाॅ.भुमेश्वर पटले यांच्या हस्ते भूमिपूजन करुन करण्यात आली. पुष्पाबाई बोरकर ते गुणीलाल पारधी यांच्याशेताकडील पांदनरस्ता व म्हास्वानी रोड ते हुतकाळ्या तलाव पांदन रस्ता,सिंधी तलाव ते धम्म कुटी पांदन रस्ता असे एकूण तीन काम सुरु करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य शालिंदर कापगते,चेतन वडगाये,सरपंच पुष्पमाला बडोले,शरदाताई किरसान,कामिनी गोस्वामी, झामाजी चौधरी, एफ. आर. टी.शहा, ग्राम पं.सदस्य सविता प्रधान,मीनाक्षी गाते,चंद्रकला येल्ले,छाया येल्ले,तसेच नरेश प्रधान,हितेंद्र बडोले,अनिल बिलिया,गिरीश गाते,अनिल लांजेवार,अभियंता राजरतन मेश्राम,प्रदीप गाते रोजगार सेवक हजर होते.कामावर एकूण पुरुष 195+ महिला 353 असे एकूण 548 मजुरांना काम उपलब्ध झाले आहे .ग्राम पंचायत कर्मचारी रमेश प्रधान,जीवन भोयर,फिरोज पठाण,लीना चौधरी,युनूस शेख यांनी सहकार्य केले .





