
गोरेगाव,दि.27ः तिरोडा गोरेगाव विधानसभामतदार संघअंतर्गत श्रीरामपूर येंथे खासदार क्रिडा महोत्सवाला आमदार विजयभाऊ राहांगडाले यांच्या हस्ते सुरुवात झाली .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार सुनील मेंढे तसेच प्रमुख उपस्थिती हेमंतभाऊ पटले यांची लाभली. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांच्या हस्ते ग्राउंड पुजन करण्यात आले .आपल्या क्षेत्राच्या युवकाना एक चांगला मंच उपलब्ध व्हावा व त्यांच्या मानसिक व बौद्धिक बुद्धिचा विकास व्हावा याकरीता क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.यामध्ये क्रिकेट व कबड्डी स्पर्धेकरीता विधानसभा स्तरावर प्रथम 21000, द्वितीय 11000 बक्षिस ठेवण्यात आले असून विजयी संघाला लोकसभास्तरावर जाण्याची संधी प्राप्त होणार आहे.यावेळी जि. प. सदस्य पंकज राहांगडाले , डॉ. लक्ष्मण भगत ,डॉ साहेबलाल कटरे,पवन पटले ,चत्रभुज बिसेन, प्रितीताई कतलाम , शैलेश नंदेश्वर , रेखलालभाऊ टेंभरे , दुर्गा ठाकरे , विश्वजित डोंगरे ,हुपराज जमइवॉर, आशिष बारेवार ,स्वानंद पारधी, गिरधारी बघेले , चित्रलेखाताई चौधरी , नलिनीताई सोनेवाने , किशोरजी पारधी , इसुलालजी सोनेवाने , विनोद पटले , पप्पु बिसेन , सरफराज शेख , वैभव राहांगडाले आणि मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ता उपस्थित होते.





