34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राष्ट्रीय देश कूवर मराठी भाषा दिन उत्साहात साजरा, मायमराठीच्या प्रेमाचे उमटले प्रतिबिंब

कूवर मराठी भाषा दिन उत्साहात साजरा, मायमराठीच्या प्रेमाचे उमटले प्रतिबिंब

0
29

blank

28 फेब्रुवारी, 2022: जगभरातले मायमराठीचे रसिक मराठी भाषा दिन जगभरात उत्साहात साजरा करत आहेत. समाजमाध्यमांवरही याचे प्रतिबिंब उमटते आहे. ‘कू’मराठी वरही राजकारणी, साहित्यिक, कलावंत आणि जनसामान्य मराठीविषयीची आपली कृतज्ञता भरभरून व्यक्त करत आहेत.

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन दरवर्षी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मायक्रो-ब्लॉगिंग अॅप ‘कू’वरही यानिमित्ताने #उत्सवमराठी भाषेचा हा हॅशटॅग चालवला गेला. मराठीजन आज मराठीवरच्या प्रेमाची, अभिमानाची गोष्ट सांगत आहेत. विविध विचार, मतं यांसह कविता, चारोळ्या आणि चित्रांमधूनही ‘कू’ युजर्स हे प्रयोगशीलपणे करत आहेत.

‘कू’ मराठीसह दहा भारतीय भाषांमध्ये लोकप्रिय असलेले अॅप आहे. मराठीसह प्रादेशिक भाषांमध्ये लोकांनी प्रभावीपणे व्यक्त व्हावे हा या मंचाचा हेतू आहे. राजकारण, समाजकारण, साहित्य, उद्योग, क्रीडा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील नामवंत मराठी भाषिक लोक ‘कू’वर मोकळेपणाने आपली मतं मांडत असतात.

अभिनेत्री सुझान बर्नेट हिने मराठी दिनाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. सदिच्छांच्या शब्दांसह आपल्या नऊवारीतल्या सुंदर छायाचित्रासह ती ‘कू’वर राजभाषा दिन साजरा करते आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी कवी कुसुमाग्रजांना अभिवादन करत त्यांच्या कवितेच्या ओळींसह एक खास व्हीडिओ पोस्ट केला आहे. यात लहान मुले गोड आवाजात मराठी कविता म्हणत आहेत.

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनीही मराठी भाषा दिनाच्या सदिच्छा दिल्या आहेत. ‘सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रतिभावंत कवी नाटककार व लेखक कविवर्य वि. वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सुरेख शब्दांत मातृभाषेची महती सांगितली आहे. ‘भाषेला केवळ संवादमूल्य नाही. ती आपल्या वैचारिकतेचीही जननी आहे. जे संस्कार आई करते तेच संस्कार मातृभाषेतूनही होतात.’ या शब्दात त्यांनी मायमराठीला अभिवादन केले आहे.

काय आहे ‘कू’?

‘कू’ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. ज्या देशातील फक्त १०% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे जो भारतीय युजर्सना त्यांच्या भाषेतला अस्सल अनुभव देऊ शकेल, त्यांना एकमेकांशी जोडून ठेवेल. भारतीय भाषांमध्ये संवाद साधायला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांच्या आवाजासाठी ‘कू’ एक मंच मिळवून देतो. सध्या Koo मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ, आसामी, पंजाबी आणि बंगाली अशा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. नुकतेच ‘कू’ ने 2 कोटी डाउनलोड्स पूर्ण केले आहेत. राजकारण, क्रीडा, माध्यम, कला, अध्यात्म या क्षेत्रातील दिग्गज Koo च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नियमित संवाद साधत असतात.

blank