36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News विद्यार्थी म्हणाले- अधिकाऱ्यांनी फोन कट केले, व्हॉट्सअप मेसेजचेही उत्तर नाही; काय कारवाई...

विद्यार्थी म्हणाले- अधिकाऱ्यांनी फोन कट केले, व्हॉट्सअप मेसेजचेही उत्तर नाही; काय कारवाई करणार भारत सरकार?

0
38

रशिया आणि युक्रेन यांच्यातील भीषण युद्धादरम्यान अडकलेले भारतीय विद्यार्थी युक्रेनमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांची बेजबाबदार वृत्ती कधीही विसरणार नाहीत. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, भारत सरकारने वेळीच सक्रियता दाखवली नसती, तर दूतावासाच्या भरवशावर आतापर्यंत उणे 3 अंश तापमानात ते गोठून गेले असते. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

युक्रेनमधील कडाक्याची थंडी आणि बॉम्ब- क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यातून वाचून भारतात परतलेल्या काही विद्यार्थ्यांशी भास्करने चर्चा केली. तुम्हीही वाचा त्यांची अंगावर शहारे आणणारी आपबीती…

काहीच व्यवस्था नाही, फक्त सांगितले – रेल्वे स्टेशन गाठा

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने 28 फेब्रुवारी रोजी एक नोटीस जारी केली होती, ज्यामध्ये असे लिहिले होते की, सर्व भारतीय विद्यार्थ्यांना आज भारतात परतण्यासाठी सीमेवर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. युक्रेन सरकारने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.

कीव्हपासून 900 किमीचा प्रवास करून रोमानियाच्या सीमेवर पोहोचलेली मेडिकल युनिव्हर्सिटीची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अवंतिका म्हणते की, नोटीसमध्ये हे सांगण्यात आले नाही की आम्ही क्षेपणास्त्रांच्या दरम्यान रेल्वे स्टेशनवर कसे पोहोचावे?

नोटीस दिल्यानंतर आम्ही दूतावासाला अनेक फोन केले पण तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज वाचले जात होते, पण त्यांना उत्तर दिले जात नव्हते. जोखीम पत्करून रेल्वे स्टेशनवर पोहोचताच तिथून दोन गाड्या बदलून लवीवला पोहोचलो.

रेल्वेच्या डब्यांत कोंबलेले आम्ही कसेबसे लवीवला पोहोचलो. कीव्हपासून आम्ही सुमारे 450 किलोमीटरचे अंतर 5-6 तास उभे राहून पार केले. जेवढे लोक बसले होते त्याच्या तिप्पट लोक उभे होते. ट्रेनमध्ये गर्दीची स्थिती अशी होती की, टॉयलेटच्या सीटवर उभे राहूनही विद्यार्थ्यांनी हा प्रवास केला. आम्हाला सांगण्यात आले की, लवीवमध्ये भारतीय दूतावासाची शिबिरे उभारण्यात आली आहेत, तेथून आम्हाला सीमेपर्यंत बसने दूतावासात नेले जाईल.

युक्रेनमधून निघताना भारतीय विद्यार्थ्यांना पावला-पावलावर अडचणींचा सामना करावा लागला.
युक्रेनमधून निघताना भारतीय विद्यार्थ्यांना पावला-पावलावर अडचणींचा सामना करावा लागला.

लवीवमध्ये पोहोचताच भारतीय दूतावासाने हात वर केले

लवीवमधली परिस्थिती पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. इथे आल्यावर कळलं की इथे आपल्यासाठी काहीच नाही. सीमेवर जाण्यासाठी ना बस ना खाण्यापिण्याची व्यवस्था. शिबिराची परिस्थिती अशी होती की, त्यात आम्हाला नीट उभेही राहता येत नव्हते. इथेही रात्र काढायची होती. ब्लँकेट, गाद्या काहीच नव्हते.

अवंतिका पुढे म्हणाली की, “मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते, मग तुम्हाला समजेल की भारतीय दूतावास आमच्यासोबत काय करत आहे? छावणीत बसायलाही पुरेशी जागा नाही.”

परिपत्रकात नावे असलेल्या अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी

कीव्ह मेडिकल युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थिनीने व्हॉट्सअॅप कॉलवर प्रतिक्रिया दिली, ‘आम्ही भारतीय विद्यार्थी आहोत. आम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याची जबाबदारी दूतावासाची नाही का?”

दूतावासाचे काम केवळ परिपत्रके जारी करणे आहे, युद्धसदृश परिस्थितीत मदत करणे नाही का? विद्यार्थ्यांना त्यांच्याच अटींवर सोडण्यात आले. मदतीच्या नावाखाली नोटिसा बजावून अधिकाऱ्यांनी हात झटकले.

युक्रेनला वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या या विद्यार्थिनीने नाव न छापण्याची विनंती केली. तिला भीती वाटत होती की कदाचित तिला टारगेट केले जाऊ शकते! ती म्हणाली, “माझ्या नावापेक्षाही महत्त्वाचे हे प्रश्न आहेत, जे मी विचारत आहे.”

युक्रेनमधील भारतीय दूतावासाच्या भूमिकेवर काय चौकशी होणार? ज्या अधिकार्‍यांचे नंबर परिपत्रकात छापले आहेत, त्यांना भारत सरकारने आम्हाला मदत करण्यासाठी बोलावले पाहिजे. ज्यांना आम्ही शेकडो मेसेज पाठवले, कॉल केले. पण त्यांचे उत्तर आम्हाला कधीच मिळाले नाही.

व्हॉट्सअॅप कॉलवर असलेल्या एका विद्यार्थ्याने फोन दाखवत विचारले- ‘मी या अधिकाऱ्याला शेकडो कॉल आणि मेसेज केले, पण कशाचेही उत्तर मिळाले नाही. पण सगळे मेसेज मात्र नक्कीच वाचले जात होते. तिने सवाल केला की, दूतावासाची भूमिका काय असते?

कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना त्यांच्या नशिबावर सोडून देण्यात आले होते.
कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना त्यांच्या नशिबावर सोडून देण्यात आले होते.

आम्ही रोमानियाच्या सीमेवर पोहोचलो, तेव्हा कळली शांततेची किंमत

अवंतिका या वैद्यकीय विद्यार्थिनीने प्रत्येक टप्प्यावर ‘दैनिक भास्कर’शी चर्चा केली, कीव्ह सोडल्यापासून सीमेपर्यंतच्या सुमारे 900 किमीच्या प्रवासादरम्यान चॅटिंग केली, व्हिडिओज पाठवले. सीमेवर पोहोचल्यावर पहिल्यांदाच तिचा जीव भांड्यात पडल्याचे जाणवले.

25 फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत तिच्याशी दररोजच संभाषण झाले. यादरम्यान तिच्या आवाजात तीव्र नाराजी आणि निराशा स्पष्ट दिसत होती. ती फक्त एवढंच म्हणायची, आम्ही घरी सुखरूप पोहोचावं, यासाठी प्रार्थना करा. रोमानियन बॉर्डरवर गेल्यावर पहिल्यांदाच अवंतिकाच्या आवाजात आशा दिसून आली.

ती म्हणाली, ‘आता आम्ही घरी पोहोचू.’ फोन डिस्कनेक्ट केल्यावर तिचा मेसेज आला, इतक्या दिवसांनी पहिल्यांदा काहीतरी चांगलं मिळालं. येथे चोवीस तास ताजे अन्न मिळतेय. गाद्या आहेत, ब्लँकेट आहेत. शेल्टर आहे. येथे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शांतता. असं वाटतंय, आज मला झोप येईल.

blank