33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता देऊळगावातून बनावटी सुगंधी तंबाखू जप्त

देऊळगावातून बनावटी सुगंधी तंबाखू जप्त

0
22

आरमोरी- राज्य सरकारच्यावतीने संपूर्ण राज्यात सुगंधी तंबाखू तयार करण्यावर बंदी घातली आहे. परंतु, राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात बंदी असतानाही मोठय़ाप्रमाणात सुगंधित तंबाखू उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकांनी कच्चा माल खरेदी करून आपल्या घरीच सुगंधित तंबाखू बनविणे सुरू केले आहे. असाच एक प्रकार आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथे उघडकीस आला. बुधवारी आरमोरी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देऊळगाव येथील जितेंद्र विठोबा सहारे याच्या घरी पोलिसांनी धाड टाकून सुगंधीत तंबाखू सह तंबाखूचे खाली डब्बे व शिल करण्यासाठी वापरण्यात आली मशीन, असा एकूण ६३ हजार १३0 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या पथकातील पोलिस अधिकारी उईके, अंमलदार प्रकाश जाधव, सुमित बरडे, समीर कांबळे, शैलेश तोरपकवार यांनी केली. याप्रकरणी जितेंद्र सहारे यांच्याविरुद्ध आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांचन उईके करीत आहेत. आरमोरी शहरासह तालुक्यातील विविध गावात बनावटी सुगंधी तंबाखू बनवून चिल्लर विक्रेत्यांपर्यंत पोहोचविला जात आहे. आरमोरी तालुक्यातील व शहरात या व्यावसायासोबत अनेक जोडले गेले असलयाची नागरिकांतून चर्चा केली जात आहे. तालुक्यातील काही प्रमुख गावात या व्यवसायाचे प्रमुख केंद्र बनले आहे. पोलिस विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

blank