35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home रोजगार/व्यापार उमेदचा उपक्रम ;४५ विद्यार्थी प्रशिक्षणासाठी रवाना

उमेदचा उपक्रम ;४५ विद्यार्थी प्रशिक्षणासाठी रवाना

0
38

blank

भंडारा-उमेद मार्फत डी. डी. यु. जी. के. वाय. योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ४0 बेरोजगार युवक युवतींना प्रशिक्षणाची संधी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना राबविली जाते. या योजनेच्या माध्यमातून २ मार्च रोजी मोहाडी, तुमसर व लाखनी तालुक्यातील एकूण ४५ विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाकरिता रस्तोगी एज्युकेशन सोसायटी राजनांदगाव येथे पाठविण्यात आले. सदर संस्थेमध्ये इलेक्ट्रिशियन सहा महिन्याचे प्रशिक्षण बेरोजगार युवक-युवतींना देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना जॉब प्लेसमेंट देण्यात येणार आहे.
या योजनेची सुरुवात सन २0१४ पासून करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील युवक युवतींना यांना व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देणे सोबतच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आधारावर रोजगार उपलब्ध करुन देणे हा आहे. सदर योजना ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा भारतातील सर्व राज्यांमध्ये सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात सुद्धा ही योजना सुरू आहे.
बेरोजगार युवक युवतींना पाठविताना उमेद अर्थातच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे जिल्हा अभियान व्यवस्थापक गौरव तुरकर, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मोहाडी येथील तालुका अभियान व्यवस्थापक सुनील पटले, रस्तोगी एज्युकेशन सोसायटीचे श्री. नितेश तसेच तालुका व्यवस्थापन कक्ष मोहाडीचे सर्व प्रभाग समन्वयक उपस्थित होते. ही योजना ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहमध्ये समाविष्ट सदस्यांच्या बेरोजगार युवक-युवतींकरीता आहे. या योजनेचा मूळ उद्देश समूहातील महिलांच्या कुटुंबातील युवक-युवतींना कौशल्य आधारित प्रशिक्षण मिळावे व स्वयंसहायता समूहातील महिलांचा आर्थिक उत्पन्न वाढावा याकरिता आहे, असे मार्गदर्शन जिल्हा अभियान व्यवस्थापक यांच्याकडून करण्यात आले.

blank