
गडचिरोली पोलीस दल आयोजित पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पहिले ‘भव्य गडचिरोली महोत्सव’ उत्साहात
विजेत्या संघाचा मान्यवरांकडुन सत्कार.
बचत गट व स्वयंसहायत गटांना मिळाली भव्य बाजारपेठ, विविध स्टॉलमध्ुन 14 लाखांच्यावर वस्तुंची विक्री
गडचिरोली,दि.04ः-गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन जिल्हयात पहील्यांदाच ‘भव्य गडचिरोली महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले.हा महोत्सव जिल्हा परिषद कार्यालयाच्या मैदानावर दिनांक 01 ते 02 मार्च दरम्यान पार पडला. या महोत्सवाचा समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम 2 मार्च रोजी गडचिरोली पोलीस अधिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या महोत्सावात आयोजित स्पर्धेतील व्हाॅलीबाल स्पर्धेत सिरोंचा व रेलानृ्त्य स्पर्धेत झिंगानूर संघाने प्रथम पुरस्कार पटकावला.सोबतच विविध बचत गटाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टाॅलमधून 14 लाखाच्यावर वस्तुंची विक्री करण्यात आली.
दोन दिवसापासुन चाललेल्या या गडचिरोली महोत्सवाचे विशेष आकर्षण बिरसा मंुडा व्हॉलीबॉल स्पर्धा व आदिवासी रेला समुह नृत्य स्पर्धा तसेच हस्तकला प्रदर्शन राहिले.महोत्सवाचा शुभारंभ जिल्हयाचे पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्हयाच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील व्हॉलीबालचे 10 संघ सहभागी झाले होते.व्हॉलीबॉल स्पर्धेत 03 विजेत्या संघांची निवड करण्यात आली. प्रथम क्रमांक विजेते असरअल्ली व्हॉलीबॉल सिरोंचा या संघास 25,000/-रु. रोख, ट्राफी व गोल्ड मेडल, व्दितिय क्रमांकाचे विजेते आरडी क्लब अहेरी यांना 20,000/-रु. रोख, ट्राफी, सिल्व्हर मेडल, व तृतिय क्रमांकाचे विजेते जय बजरंग क्लब एटापल्ली यांना 15,000/- रु. रोख, ट्राफी व ब्रााँझ मेडल देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणुन कामगिरी करणाया तरुण राघवसु गावडे, उत्कृष्ट स्मॅशर म्हणुन अंजी कनयक्का पेद्दी व उत्कृष्ट लिफटर म्हणुन निसार शेख यांना चषक, ट्रॅकस्ुट व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच महोत्सवाच्या दुसर्या दिवशी 02मार्च रोजी आदिवासी रेला समुह नृत्य स्पर्धा पार पडल्या. त्यातुन आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन उपस्थितांना पहावयास मिळाले. या रेला नृत्य स्पर्धेत जिल्हयातुन 10 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी उत्कृष्ट पहील्या तीन विजेत्यांची निवड करण्यात आली. प्रथम विजेत्या जय सेवा रेला संघ झिगानुर यास 25,000/रु. रोख, ट्राफी व प्रमाणपत्र, व्दितिय क्रमांकाच्या अनुप डॉन्स रेला संघ घोट यास 20,000/रु. रोख, ट्राफी व प्रमाणपत्र, आदिवासी रेला नृत्य संघ धानोरा यास 15,000/रु. रोख, ट्राफी व प्रमाणपत्र व इतर सहभागी संघांना उत्तेजनार्थ प्रत्येकी 5000/- रोख देवुन गौरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्राच्या अतिदुर्गम भागातुन आलेल्या आदिवासी पारंपारिक रेला नृत्यासोबतच राजमुद्रा ग्रुपच्या कलावंतानी विविध नृत्य सादर करुन प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.
महोत्सवातील दोन्ही दिवस गडचिरोली जिल्हयातील विविध 50 बचत गट व संस्थांनी आपल्या उत्पादनाचे व विविध वस्तुंचे स्टॉल लावलेले होते. यामध्ये नवजीवन उत्पादक संघ, नवेगाव गडचिरोली, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, एम्स अकॅडमी बुक स्टॉल गडचिरोली सोबतच मौजा किटाळी, वासाळा, पुराडा, कोटमी, भामरागड, अहेरी येथुन बांबु, माती व लाकडापासुन निर्मीत हस्तकलेच्या वस्तु, ऑर्गनिक उत्पादने तांदुळ, हळद, पालेभाज्या, अंबाडी सरबत, मोहफुलापासुन तयार केलेले लाडु बिस्किट, जॉम, मस्य लोणचे, जांभुळ निर्मीत विविध उत्पादने तसेच इतर वस्तु विक्रीकरीता लावण्यात आले होते. बचत गट व स्वयंसहायता गटांच्या विविध हस्तकलेच्या वस्तुंच्या स्टॉलमधुन 14 लाखाच्यावर उपस्थित नागरीकांनी खरेदी केली. या महोत्सवाच्या माध्यमातुन बचत गट व संस्थांना मोठी बाजारपेठ मिळाली.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली कुमार आशिर्वाद, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे अधिष्ठाता श्री. कडु, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड गणापुरे, कृषी विज्ञान केंद्र (आत्मा) गडचिरोली संदिप कहाडे यांचे हस्ते पार पडले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परीश्रम घेतले.




