41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home क्रीडा नैलेश शेंडेची अखिल भारतीय नेमबाजी स्पध्रेसाठी निवड

नैलेश शेंडेची अखिल भारतीय नेमबाजी स्पध्रेसाठी निवड

0
30

blank

गोंदिया-पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र पोलिस क्रीडा नेमबाजी स्पर्धेत गोंदियात पोलिस दलातील पोलिस हवालदार नैलेश शेंडे यांनी ३00 मीटर प्रोन पोजिशन रायफल प्रकारात सुवर्णपदक तसेच ३00 मीटर थ्री पोजिशन रायफल प्रकारात रजतपदक प्राप्त केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची अखिल भारतीय नेमबाजी स्पधेर्साठी निवड झाली. त्यांचे मुंबई येथे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी सत्कार केला. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍व पानसरे, पोलिस उपअधीक्षक दिनकर ठोसरे, राखीव पोलिस निरीक्षक रमेश चाकाटे, राखीव पोलिस उपनिरीक्षक मोरेश्‍वर लोहारे तसेच गोंदिया पोलिस दलाने त्यांचे अभिनंदन करुन पुढील स्पधेर्साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

blank