राजमुद्रा ग्रुपने केले शिवभक्तांना सन्मानित

0
18
तुमसर: राजमुद्रा ग्रुप तुमसर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव 2022 शासकीय नियमाचा पुरेपूर भान ठेवून नेहमी प्रमाणे साजरा करण्यात आला, त्यात विविध प्रकारची झाकी काढण्यात आली होती, त्यामध्ये शहरातील अनेक कलाकार, बाल कलाकारांनी सहभाग घेतला होता, व शहरातील प्रतिष्ठित महिलांनी भाग घेत विशेष योगदान देत कार्यक्रमाची शोभा वाढविली याबद्दल सर्वाचे आभार मानत राजमुद्रा ग्रुप च्या वतीने पालकांना शाल, श्रीफळ आणि कलाकारांना स्मृतीचिन्ह व सन्मान पत्र  देऊन विजयाताई चोपकर, गीताताई कोंडेवार, अश्विनीताई बडवाईक, अश्विनीताई बिसने, दुर्गाताई कुंजेकर, जगदीश पटले, सचिन चामट, रंजीत पटले, प्रीतम चामट, अभिषेक उकेताहेने, विक्की मेश्राम, सचिन पटले, मनस्वी निमजे, आरुल हटवार, वंश कांबळे, दुर्गेश बावनकर, सृष्टी बोरघरे, देवांशू नागरे, ईशिका हट्टेवार,मिहिका हट्टेवार, यामिनी हट्टेवार यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी सांगीतले की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच राजमुद्रा ग्रुप ची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही अशिच राहील. या प्रसंगी राजमुद्रा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष इंजी. सागर गभने, उपाध्यक्ष सागर भुरे, सचिव योगेश आजापुजे, सहसचिव अनुप तिडके, कोषाध्यक्ष शुभम बाणासुरे, राहुल रणदिवे, बापू बडवाईक, स्वपणील डुंबरे उपस्थित होते.