ग्रामसेवकानो निखाऱ्यावरून चालण्याची सवय लावा -एच. बी. पाण्डे यांचे प्रतिपादन

0
79

निरोप समारंभ थाटात

गोंदिया ता.7:- ग्रामपंचायतिचं कामकाज करताना हल्लीच्या दिवसात ग्रामसेवकाला तारेवरची कसरत करावी लागते,
संगणकाचा जमाना आणि गावातील राजकारणामुळे ग्रामसेवकांनी निखाऱ्यावरून चालण्याची सवय करून घ्यावी असा सल्ला गोंदिया जिल्हा ग्रामसेवक संघांचे अध्यक्ष हंसराज पाण्डे यांनी (ता.6) दिला.गोंदियात आयोजित त्यांच्या सेवानिवृत्तीपर निरोप व सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ग्राम विकास अधिकारी श्री योगराज टेम्भरे यांनाही निरोप देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघांचे उपाध्यक्ष आर. एन. बहेकार हे होते. मंचावर मार्गदर्शक पी. एस. गजभिये, एम. ए. पटले,सत्कारमूर्ती हंसराज पाण्डे,सौ मंजुताई पाण्डे, योगराज टेम्भरे,सौ. रेखाताई टेम्भरे, आणि सौ. पटले मॅडम उपस्थित होते.
गोंदिया जिल्हा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक व्हिडिओ संघाच्या वतीने हा निरोप आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.याप्रसंगी पुढे बोलताना श्री पाण्डे म्हणाले की आपण 31 वर्षांच्या नॊकरी नंतर सेवानिवृत्त झालो., पण मागील 15 वर्षाच्या काळात नॊकरी करणे आणि तिला सांभाळून ठेवण्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्याची नेहमीच जाणीव राहील असे ते म्हणाले. श्री गजभिये यांनी सांगितलं की, गावातील जनसंमस्यांना तोंड देतानाच ऑनलाईन कामांच्या भानगडीनमुळे ग्रामसेवकांची धावपळ वाढली आहे. असे ते म्हणाले.
श्री बहेकार यांनी सांगितलं की अहवाल देण्यातच ग्रामसेवकाचे हालहाल होतात, त्यातच सौचालय आणि आवास योजनामुळे लोकांच्या नाराजीला सामोरे जावावे लागते असे ते म्हणाले. या वेळी श्री पटले, सत्कारमूर्ती श्री टेम्भरे यांनीही विचार मांडले.यावेळी श्री पाण्डे आणि श्री टेम्भरे यांचा सापतनिक शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.दरम्यान संघाच्या सदस्य संख्येचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हा सचिव अरविंद साखरे यांनी प्रास्ताविक केले. प्रसिद्धी प्रमुख पृथ्वीराज कोल्हटकर यांनी संचालन तर कुंदाताई मेंढे (गजभिये ) यांनी आभार मानलं. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एन.बी. लांजेवार, श्रीमती अंतकला साखरे (बनकर ), श्री खांडेकर, श्री प्रमोद बिसेन, श्री नरेश बघेले, श्री शहारे यांनी सहकार्य केले.