
गोरेगांव ,दि.08ः- युक्रेन आणि रशियात सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेला मोहाडी येथील उमेन्द्र मुन्नालाल भोयर हा विद्यार्थी भारत सरकारच्या वतीने मायदेशी सुखरूप पोहचला असून आपल्या स्वगृही परतला आहे.
मोहाडी येतील विद्यार्थी उमेंन्द्र मुन्नालाल भोयर हा मागील एक वर्षापासुन युक्रेन येथे एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेला होता.पण युद्धामुळे ४ मार्चला मायदेशी सुखरूप परतला.त्यानिमित्त मोहाडी येतील सामाजिक संगठन स्वभिमान बचत फाऊंडेशनने आज उमेंन्द्र भोयर यांचे सत्कार केला.
यावेळी स्वभिमान बचत फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्रकुमार चौरागडे, सचिव वाय.एफ.पटले, हिरालाल महाजन, प्रमानंद तिरेले, भाऊलाल चौव्हाण, तेजलाल कावडे,आर एफ पारधी, हेमराज भोयर,छगणलाल धुर्वराज पटले,श्रीराम पारधी, धपाडे,टोलीराम भोयर, जे जे पटले, योगेश्वर पटले,टिकेश धपाडे,योगराज भोयर,वामणराव गोलंगे,मुन्नालाल भोयर, तेजराम चाचेरे, राहुल शेन्डे,किशोर सोनवाने, नुतनलाल सोनवाने, विनोद जायसवाल,विठ्ठल ठाकरे आदी सभासद बाधंव उपस्थित होते.