गोरेगांव,दि.08:- तालक्यातील ग्रामपंचायत मुंडीपार येथे उडाण प्रभाग संघ कार्यालयात जागतीक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज 08 मार्च ला जागतीक महिला दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य डॉ. लक्ष्मण भगत हे होते.पं.स.सदस्य शितलताई सुरेंद्र(बबलु)बिसेन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तालुका कृषी पर्यवेक्षक एम.बी.ठाकुर,आत्मा अंतर्गत गजानन पटले,पंढरीनाथ कटरे,कृषी व्यवस्थापक राजेश चौधरी, ग्राम रोजगार सेवक उमेंद्र ठाकुर, प्रभागसंघ अध्यक्ष बिंदिया धमगाये, ग्रामसंघ अध्यक्ष माधुरी बोमले,कृषीसखी ज्योती ठाकुर,सर्व कँडर,समुहातील महिला सदस्य व जि.प.शाळेचे सर्व शिक्षकवृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आले.
सन 1909 मध्ये पहिल्यांदा ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला होता. नंतर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एका थीमसह महिला दिन साजरा करण्याची प्रथा सुरु केली.दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आप आपल्या पद्धतीने महिलांप्रती आदर व्यक्त करतात.





