34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home क्रीडा भार्गव वाघाये रनिंगमध्ये प्रथम पटकावत ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

भार्गव वाघाये रनिंगमध्ये प्रथम पटकावत ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

0
29

blank

भंडारा: यूथ गेम्स महाराष्ट्र चॅम्पियनशिप 2022 अंतर्गत क्रीडा संकुल भंडारा येथे विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रनिंग या क्रीडा प्रकारात 10 वर्षाखालील वयोगटात केसलवाडा वाघ येथील भार्गव प्रशांत वाघाये याने 100 मीटर तसेच 200 मीटर दोन्ही रनिंगमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्णपदक मिळवलेले आहे.

भार्गव हा उत्तम क्रीडापटू असून विविध क्रीडा प्रकारात त्याला आवड आहे. दररोज तो मैदानावर सरावासाठी देखील वेळ काढत दैनंदिन सराव करत असतो. त्याच्या या यशासाठी कुटुंबीयांसह सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

blank