जागतिक महिला दिनानिमित्त ग्राम गुदमा येथे महिला जागृती सम्मेलन
*गुदमा:-* “महिलानी सर्वसामान्य जिवन जगत असताना पारिवारिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रत्येक बाबतीत सक्षम असावे, कुणावर अवलंबून राहु नये, उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्यदायी जीवन आवश्यक आहे म्हणून स्त्रियानी निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी काळजी घ्यावी” असे प्रतिपादन वन स्टॉप क्राईसेस सेंटरच्या केंद्र प्रमुख गुलशनी केरकट्टा यानी मार्गदर्शक म्हणून ग्राम गुदमा येथील आंगनवाड़ी सेंटर मध्ये जागतिक महिला दिना निमित्त क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले विचार मंचच्या वतीने *”महिला जागृती सम्मेलन”* कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ सावित्री रमाई यांच्या छायाचित्रा समोर दिप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून *प्रा.डॉ. दिशा गेडाम* (अध्यक्ष -सर्वसमाज विचार महोत्सव समिति) यानी आपले विचार व्यक्त करताना “आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे होय.आज पुरुषांबरोबर स्त्रियादेखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत, परंतु आजदेखील स्त्री सुरक्षित नाही, हे खेदाने बोलावेच लागेल. लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी, भृणहत्या या गोष्टींमुळे स्त्रियांच्या मुलींच्या मनात भीतीची, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यास कुठं न कुठं पुरुषवर्गासह महिलावर्ग जबाबदार आहे स्त्रियांनी शारीरीक, मानसिक , आर्थिक, सामाजिक सक्षमते सोबत विज्ञानवादी व्हायला हवं. स्त्री ने स्त्रिशीच शत्रुत्व न करता एक सुरक्षित अस दीपस्तंभ बनायला हवं. तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला दिन साध्य होणार” म्हटले.
याप्रसंगी प्रमुख अतिथि म्हणून आयुष सेंटरच्या सावित्री नडवती, छाया क्षीरसागर, सावित्रिमाई फुले विचार मंचच्या सपना मेश्राम, कविता खव्वासे (अंगणवाडी सेविका गुदमा), सुरेखा पाथोडे (अंगणवाडी सेविका गुदमा), आशा ब्राम्हणकर (सीआरपी गुदमा ), तेजिस्विनी डोये (आयसीआरपी गुदमा ), रजनी फुंडे (कृषी सखी, गुदमा), करिश्मा गजभिये ( पशु सखी गुदमा ), अस्मिता ब्राम्हणकर, मनीषा पाथोडे (अध्यक्ष, सावित्रीमाई विचार मंच गुदमा), गीताताई मेंढे (उपाध्यक्ष, सावित्रीमाई विचार मंच गुदमा), पारबता हेमने, करिश्मा गजभिये, शांता ब्राम्हणकर, पंचशीला गणवीर आदि उपस्थित होते. संचालन मनीषा पाथोडे यानी तर उपस्थितांचे आभार प्रियंका गणवीर यानी मानले.
जागृती कार्यक्रम यशस्विते करीता आंगनवाड़ी सेविका व महिला बचत गट समूह ग्राम गुदमा, सर्वसमाज विचार महोत्सव समिति, संविधान मैत्री संघ, आम्ही सिद्ध लेखिका, गोंदिया जिल्हा यांच्यातर्फे प्रयास केले गेले.





