
गोंदिया,दि.10 : महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदियाच्या वतीने नविन प्रशासकीय इमारतीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील हया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध शासकीय, निमशासकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला नेतृत्वाचे स्वागत व सत्कार उपविभागीय अधिकारी गोंदिया यांच्या हस्ते करण्यात आले.
महिलांच्या उत्थानासाठी समाजामध्ये प्रचार आणि प्रसाराकरीता गोंदिया शहरामध्ये बचतगट महिलांची बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये माविम स्थापित लोक संचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक, सहयोगिनी, लेखापाल व बचत गटाच्या सदस्य महिला यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभाग घेतला.प्रशासकीय इमारत जयस्तंभ चौक ते नगरपरिषद-गांधी प्रतिमा चौक-दुर्गा चौक-चांदणी चौक-गोरेलाल चौक ते नविन प्रशासकीय इमारत गोंदिया येथे समारोप करण्यात आला. उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
कार्यक्रमास तहसिलदार धनंजय देशमुख, अपर तहसिलदार अनिल खडतकर,नायब तहसिलदार आर.एन.पालांदूरकर व गीता सरादे, पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार, पुरवठा निरीक्षक भारती वाकोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सहनियंत्रण अधिकारी श्री कुकडकर, लेखाधिकारी श्री वैरागडे, प्रफुल अवघड, श्री सोनवाने, हेमंत मेश्राम, तृप्ती चावरे,प्रीती जेंगठे आणि उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
देवरी येथील प्रकल्प कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा
प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांचे अध्यक्षतेखाली तसेच अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच कार्यालयातील सर्व महिला अधिकारी/कर्मचारी व पुरुष अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थितीत देवरी येथील प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात जागतिक महिला दिन कार्यक्रम पार पाडण्यात आला.यावेळी प्रकल्प कार्यालयातील सर्व महिला अधिकारी/कर्मचारी यांना जागतिक महिला दिनानिमीत्त शाल व श्रीफळ, मानचिन्ह, रोपटे देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, श्री बनकर, श्रीमती मिश्रा यांनी जागतिक महिला दिनानिमीत्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन किशोर चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री सरियाम यांनी मानले.




