आमगाव(तुलसीदास भुजाडे):-आमगाव तालुक्यातील सामान्य जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडणारे माध्यमातील पत्रकारांच्या गोंदिया जिला मराठी पत्रकार संघाची संलग्न असलेल्या आमगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा.झेड.एस.बोरकर व सचिवपदी नरेंद्र कावळे यांची निवड करण्यात आली.ही सभा तालुका पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष इसुलाल भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेत पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या संघाच्या अध्यक्षपदी तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी प्राध्यापक झेड एस बोरकर तर सचिव पदी लोकमतचे प्रतिनिधी नरेंद्र कावळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
18 सदस्य असलेल्या आमगाव तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी करिता बैठकीचे आयोजन भवभूती कर्मचारी सह पत संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी 16 सदस्य उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष ईसुलाल भालेकर यांनी कालावधीतील संघाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचा विशेष उल्लेख करीत आपले अनुभव व्यक्त केले.नंतर सर्वानुमते आमगाव तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी ची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा झेड एस बोरकर , उपाध्यक्ष अजय खेतान, उपाध्यक्ष राजीव फुंडे, सचिव नरेंद्र कावळे, सहसचिव सुनिल पडोळे, कोषाध्यक्ष दिनेश शेंडे,प्रचार प्रसार प्रमुख राधाकिशन चुटे नियुक्ति करणयात आली.
.या संघाचे इतर सदस्य , यशवंत मानकर ,सुनिल क्षीरसागर, रितेश अग्रवाल ,प्राचार्य डी एस टेभुर्णे , पालकराम वालदे, महेश मेश्राम, आनंद शर्मा, विकास शर्मा, रेखलाल टेंभरे , मुरलीधर करंडे आहेत . माजी अध्यक्ष इशूलाल भालेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन नवीन अध्यक्ष प्रा झेड एस बोरकर यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार सोपवून अभिनंदन केले .





