34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लाच प्रकरणात अटक

सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लाच प्रकरणात अटक

0
83

blank

बीड: पाटोद्यातील एका पीएसआयला सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली. पण तिसऱ्याच दिवशी त्याला एसीबीने लाचखोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली. त्यामुळे पदोन्नतीच्या आनंदावर विरजण पडलं आहे.

अफरोज तैमीरखा पठाण यांची सहायक निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. राज्यातील उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी पदोन्नतीसाठी महसूल विभागाचे वाटप करुन पसंती क्रमांक मागविलेले आहेत. याची यादी 9 मार्च रोजी अपर पोलीस महासंचालकांनी जाहीर केली. या यादीत अफरोज पठाण यांचेही नाव असल्याने सध्या त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू होता. या पदोन्नतीच्या तीन दिवसातच त्यांनी लाच मगितल्याच्या आरोपातून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पदोनत्तीच्या आनंदावर तीन दिवसातच विरजण पडलं आहे

एका जबरी लुटीच्या गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल आणि आरोपीस अटकपूर्व जामीनासाठी सहकार्य करण्यासाठी बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी संबंधितांकडे केली होती. या प्रकरणी तडजोडअंती 40 हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अफरोज तैमीरखा पठान याना एसीबीने अटक केली आहे.

अफरोज तैमीरखा पठान हे पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्यावर होते. त्यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यातील मोबाईल परत देण्यासाठी व तक्रादाराच्या भावास अटकपूर्व जामीन मंजूर करून गुन्ह्यात वापरलेली जप्त गाडी व पिस्टल सोडविण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. याच प्रकरणात 40 हजार रुपये घेताना आपल्यावर कारवाई होणार असल्याचा संशय आल्याने उपनिरीक्षक पठाण यांनी ही लाच स्वीकारली नाही. या प्रकरणी एसीबीने सखोल चौकशी केली असता पठाण यांनी लाच मगितल्याच मान्य केल्याने अखेर एसीबीने त्यांना लाच मगितल्याच्या आरोपाखाली अटक केली.

blank