34.5 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ४९९९ प्रकरणांचा एकाच दिवशी निपटारा

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ४९९९ प्रकरणांचा एकाच दिवशी निपटारा

0
51

• पक्षकारांनी केले समाधान व्यक्त
गोंदिया- वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले समोपचाराने व सामंजस्याने तात्काळ  निकाली निघावी याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये एस.ए.ए.आर.औटी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया तसेच एम. बी. दुधे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली १२ मार्च, रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे तसेच जिल्हयातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये सर्वच प्रकाराच्या तडजोडपात्र न्याय प्रविष्ठ व पूर्व न्याय प्रविष्ठ प्रकरणाकरीता तसेच विद्युत व बँक लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांकरीता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ४९९९ प्रकरणांचा एकाच दिवशी निपटारा करण्यात आला.
सदर लोकअदालतीमध्ये मोटर वाहन अपघात दावा हेमराज नेवारे विरूध्द न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड कंपनी जे मागील दोन वर्षापासून न्यायालयात प्रलंबित होते. त्या प्रकरणामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांच्याद्वारे प्रत्यक्ष समझौता घडवून आणला. या प्रकरणातील वयोवृध्द वादी आई – वडील यांना न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड कंपनी कडून रूपये ७ लक्ष ५० हजार नुकसान भरपाई मंजुर करुन देण्यात आले व तसे अवॉर्ड एस.ए.ए.आर.औटी यांचे हस्ते वादीला देण्यात आले.
अशाप्रकारे गोंदिया येथील जिल्हयातील एकूण न्यायालयात प्रलंबित दिवाणी व फौजदारी एकुण १४३४ प्रकरणांपैकी २६९ प्रकरणे निकाली काढण्यात आली व २५२५३७१४ रूपयांची वसुली करण्यात आली. पुर्वन्यायप्रविष्ठ १७२६० प्रकरणांपैकी ४७३० प्रकरणे निकाली काढण्यात आली व २९४८१२३५ रूपयांची वसुली करण्यात आली असे एकूण १८६९४ ठेवलेल्या प्रकरणांपैकी ४९९९ प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला. व एकूण रु. ५,४७,३४,९४९ (रूपये पाच कोटी सत्तेचाळीस लक्ष चौतिस हजार नवशे एकोणपन्नास फक्त) रूपयांची वसुली करण्यात आली.
त्याचप्रमाणे स्पेशल ड्राईव अंतर्गत जिल्हयातील न्यायालयामध्ये एकूण १२५६ फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी १९८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाली. यामुळे ब-याच पक्षकारांनी समाधान व्यक्त केले आहे. विद्युत, पाणी, टेलीफोन यांचे पूर्वन्यायप्रविष्ठ प्रकरणातील ज्या पक्षकारांनी तडजोडीप्रमाणे थकबाकीची पूर्ण रक्कम संबधित विभागाला जमा केली त्यांची प्रकरणे कायमची संपवण्यात आली. यामुळे संबधित विभाग व थकबाकीदारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च व मानसिक त्रास वाचला.
न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याकरीता गोदिया येथे विभिन्न पॅनलवर एस. बी. पराते, जिल्हा न्यायाधीश -१ अतिरिक्त सत्र न्यायाधीश, ए. एम. खान, जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, एन. बी. लवटे, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश –१, एस. जे. भट्टाचार्य, मुख्य न्यायदंडाधिकारी, एन. आर. वानखडे, दिवाणी न्यायाधीश (व.स्तर), एस. व्ही. पिंपळे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,जे. एम. चौहान, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, श्रीमती. आर. डी. पुनसे, २ रे सह दिवाणी
न्यायाधीश कनिष्ठ स्तर, व्ही. आर. आसुदानी, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, एस. डी. वाघमारे, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, व्ही. के. पुरी, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, यांनी व गोंदिया जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी. बी. कटरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सदर लोकअदालतीचे यशस्वी आयोजनाकरीता आर. जी. बोरीकर, प्रबंधक, एन. एल. रंगारी अधीक्षक, एम. पी. पटले, सहायक अधिक्षक, ए. एम. गजापुरे वरिष्ठ लिपीक, सचिन एम. कठाणे, पी. एन. गजभिये, एस. डी. गेडाम, कनिष्ठ
लिपीक, एल. पी. पारधी, बी. डब्ल्यू. पारधी तसेच इतर न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.