40.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home गुन्हेवार्ता औढा ना.चे गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

औढा ना.चे गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

0
93

blank

हिंगोली,दि.15ः- जिल्ह्यातील पंचायत समिती औंढा नागनाथचे गटविकास अधिकारी मनोहर लक्ष्मण खिल्लारी(वय 56) यांना आज 15मार्च रोजी 5 हजार रुपयाची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.तक्रारदारच्या वडिलांच्या नावे मंजूर झालेला गोठा व भावाचा नावे मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचा कार्यारंभ आदेश देण्याच्या कामाकरीता 5000/-रुपयाची लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वतः स्वीकारल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक डॉ राहुल खाडे, अप्पर पोलीस अधिक्षक
धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही निलेश सुरडकर पोलिस उपअधीक्षक,पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर,ASI युनूस सिद्दीक,HC विजय उपरे,HC शुक्ला, NPC रुद्रा कबाडे,ज्ञानेश्वर पंचलिंगे,राजाराम फुफाटे,तानाजी मुंडे,सुजित देशमुख, LNPC योगिता अवचार, हिमतराव सरनाईक यांनी ही केली.