तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

0
60

 गोंदिया- येथील रामनगर पोलीस ठाणे हदीतंर्गत येत असलेल्या कुडवा येथील एमआयटी काॅलेज समोरील तलावात सहाव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज(दि.15)सायकांळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मृत विद्यार्थाचे नाव उज्वल कुंवरलाल कुंभलकर( वय 12, वार्ड नं 1, मारुती चौक) असे आहे.माहिती मिळताच पोलीस व आपत्ती विभागाचे शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते.शोधपथकाने तलावातून विद्यार्थ्याचा मृतदेह शोधून काढला आहे.