
· 1000 रूपये दरमहा विद्यावेतन
· 28 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करावे
वाशिम,दि. 17: राज्य शासनाच्या आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर, कॅम्प, परतवाडा जि. अमरावती येथे विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामूल्य प्रशिक्षणाद्वारे तयारी करून घेण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा 1000 रूपये विद्यावेतनही देण्यात येते. तसेच प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो.
या प्रशिक्षणाकरीता उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील असणे आवश्यक असून त्याचे वय 1 एप्रिल 2022 रोजी किमान 18 वर्ष पुर्ण परंतु 15 जुलै 2022 रोजी त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेले नसावे. तसेच त्याने किमान एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तो सद्या कोणतेही शिक्षण अथवा प्रशिक्षण घेत नसावा. तरी सदर पात्रतेच्या इच्छुक उमेदवारांनी 1 एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या सत्रासाठी 28 मार्च 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, जयस्तंभ चौक, मातोश्री मंगल कार्यालयामागे लालपूल जवळ, अचलपूर कॅम्प, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती येथे अर्ज सादर करावे.
अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी उत्तीर्णची गुणपत्रिका, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे http://rojgar.mahaswayam.in संकेतस्थळावरील ऑनलाईन कार्ड, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कार्यालयात नाव नोंदविल्याचे नोंदणी कार्ड आदी प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती व एक स्वत: चा पासपोर्ट आकाराचा फोटो जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी सदर प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी यासाठी पुन्हा अर्ज करू नये. इच्छूक उमेदवार https://bit.ly/35Jh49r या लिंकवर सुद्धा अर्ज करू शकतात. तरी इच्छूक व पात्र उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, अचलपूर, जि. अमरावती यांनी केले आहे.




