40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटातून समाज व्यवस्थेवर प्रहार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटातून समाज व्यवस्थेवर प्रहार

0
37

blank

गोंदिया-स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज व्यवस्था, जातीव्यवस्थेमुळे बाबासाहेबांना कोणकोणते संघर्ष करावे लागले याचे सजीव चित्रण संविधान निर्मातो डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. येत्या ८ एप्रिल रोजी महाराष्ट्र व दिल्ली येथे शंभर चित्रपट गृहात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. उर्वरित राज्यात टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होणार असून हिंदी भाषेत चित्रपट असल्याचे कबीर म्हणाले. माहिती निर्माता निर्देशक कबीरदा यांनी आज, २१ मार्च रोजी येथील हॉटेल रॉयल ऑर्चिड येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक मनमितसिंग नय्यर, विनित गजभिये, कलाकर संजय भास्कर, रियाज सिद्दीकी, सुनिल भालेराव, विजय बहेकार, सविता उईके, सतिश पारधी आदि कलाकार, गायक उपस्थित होते.
पुढे कबीर म्हणाले, हा चित्रपट बाबासाहेबांच्या जीवनपट आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यावर व समाज व्यवस्थेवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. शिक्षणासाठी बाबासाहेबांना करावा लागलेला संघर्ष आणि तेव्हाची समाज व जातीव्यवस्था याचे चित्रपटात सजीव चित्रण आहे. चित्रपटाचे ८0 टक्के चित्रिकरण गोंदियासह परिसरातील स्थळांवर करण्यात आले आहे. यात भिमनगर, सूर्याटोला, कुडवा, तांडा, एमआयईटी, रेस्टहॉऊस आदि जागांचा समावेश आहे. चित्रपटात स्थानिक गोंदियातील कलाकार असल्याचे कबीर म्हणाले.
दलित, मागास समाजाची सत्यता या चित्रपटात अधोरेखित करण्यात आली आहे. चित्रपटात तीन गीते असून दोन तास २५ मिनिटांचे हे चित्रपट आहे. डिसेंबर २0१९ व फेब्रुवारी २0२0 अश्या दोन टप्प्यात चित्रपटाचे चित्रिकरण आम्ही पूर्ण केले होते. बाबासाहेब यांची भूमिका संजय भास्कर यांनी साकारली आहे. याशिवाय सुनील भालेराव, संतोष लिल्हारे, सविता उके, विजय बाहेकर आदी स्थानिक कलाकारांनी भूमिका साकारली असल्याचेही कबीर यांनी सांगितले.