33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता शिकारीसाठी गेलेल्या इसमाची हत्या

शिकारीसाठी गेलेल्या इसमाची हत्या

0
103

गडचिरोली.दि.22मार्च-एटापल्ली पोलीस स्टेशन हद्दीतील ताडपल्ली येथील रहिवासी राजू पुरा नरोटी (४४) हे जंगलात शिकारीसाठी गेले असता त्यांची अज्ञात इसमांनी धारदार हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. मृतक गेदा ग्रामपंचायतचे सदस्य व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. यामुळे एटापल्ली तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, राजू नरोटी १९ मार्च रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान शेजारच्या नरहानूर गावातील काही ईसमासोबत जंगलात गेले होते. मात्र सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान तेच लोक व गावातील काही नागरिक राजू नरोटी यांचे प्रेत ट्रॅक्टर मध्ये टाकून ताडपल्ली गावात घेऊन आले. व अस्वलाच्या हल्यात जीव गेला असे राजुच्या पत्नीला व नातेवाईकांना सांगितले. मात्र राजुच्या अंगावर अस्वलाच्या हल्ल्याचे कोणत्याही खुणा आढळून आले नसल्यामुळे नातेवाईकांना संशय आला व त्यांनी एटापल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलीस करीत आहे.

blank